आंबेगाव तालुक्यातील अवैध धंद्यांवर पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

पुणे वार्ता :- मा पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण डॉ अभिनव देशमुख यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी सूचना दिल्या होत्या.

दि. १५/०२/२०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण, दहशतवाद विरोधी पथक पुणे ग्रामीण तसेच मंचर पोलीस स्टेशनचे वेगवेगळ्या पथकाने कारवाई केल्या. त्यामध्ये साबिर अजगर हरियाणी वय ३१ वर्ष- रा मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे हा नामदेव थोरात त्याच्या सांगण्यावरून मटका घेतो अशी माहिती मिळाल्याने सदर इसमांविरुद्ध कारवाई करून त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम १०९९० तसेच मोबाईल व इतर ४०००/- असा एकुण १४९९०/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच नामदेव थोरात याच्या सांगण्या वरून मटका घेणारा अमित भोलेश्वर उबाळे वय- ३२ रा. घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे याचे ताब्यातून रोख रक्कम- ३००० व मोबाईल इतर ३००० असा एकुण ६०००/- रु किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.नामदेव थोरात वर यापूर्वीचे मुंबई जुगार कायद्याचे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत.

तसेच मौजे पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील सानिया किराणा अँड जनरल स्टोअर व राज किराणा अँड जनरल स्टोअर्स येथे छापा टाकून इसम नामे सत्तार भाई कादर भाई तांबोळी वय ५० वर्षे रा.पेठ, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे व सिराज कासम भाई तांबोळी वय 27 वर्षे रा. पेठ तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे याचे ताब्यातून एकूण 6450/- रुपयाचा अवैद्य पान मसाला तंबाखू (गुटखा) जप्त केला.

सदरची कार्यवाही ही मा.पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण डॉ. अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक श्री मितेश घट्टे, मा.पोलीस निरीक्षक श्री अशोक शेळके यांचे मार्गदर्शनाखाली पोनि सतिश होडगर, सपोनि नेताजी गंधारे (स्थागुशा), सपोनि अर्जुन मोहिते(ATS) पोसई सोमेश्वर शेटे (मंचर पोस्टे), सहा. फौज. प्रकाश वाघमारे(स्थागुशा),सहा. फौज. विक्रम तापकीर (स्थागुशा), पोहवा दिपक साबळे (स्थागुशा)पोहवा ईश्वर जाधव (ATS),पोना संदीप वारे (स्थागुशा),पोना विशाल बोऱ्हाडे,पोना मोसीन शेख (ATS),पोना आढारी (मंचर पोस्टे), पोशी अक्षय नवले(स्थागुशा),पोशी प्राण येवले (स्थागुशा),चा. सहा. फौज. मुकुंद कदम (स्थागुशा) यांनी केली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!