Post Views: 707
प्रतिनिधी फुलचंद जगात भगत
वाशिम:-मंगरूळपीर तालुक्यातील वर्कआऊट करणार्या महिला टीमने मातृपितृ दिनाचे औचित्य साधुन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.मुलामुलींनी आपल्या मातापित्यांना ओवाळुन आणी पुजन करुन कृतज्ञतापुर्वक मातापित्यांचे वंदन करत ऊत्साहात हा दिन साजरा केला.
मातापित्यामुळे आपणास मानवजन्म मिळाला.या जन्माचे सर्वांनी सार्थक करावे.या गोष्टीची जाणीव ठेवुन शेलुबाजार येथील महिलांनी मातृपितृ दिनाचे आयोजन करत मुलांना आईवडीलांची महती ही अपरंपार असते.आईवडीलाच्या पुन्याई आणी आशीर्वादाने आपण आपले जीवन सार्थकी लावुन चांगले कर्तव्य पार पाडत असतो याची जाणीव व्हावी या दृष्टीकोनातुन हा कार्यक्रम घेण्यात आला.मुलांनी माताभगीनींना ओवाळुन वंदन केले.या प्रेरणादायी कार्यक्रमाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ.नंदाताई डोफेकर,ममता दीदी,कल्पना डोफेकर,शालीनी बारड,श्रध्दा डोफेकर,अरुणा डोफेकर,प्रिया इंगळे,स्वाती इंगळे,कोमल मोरे,सोनल इंगळे,स्मिता डोफेकर,शुभांगी डोफेकर,रेणुका घुगे,पुजा लोखंडे,अश्वीनी सोनटक्के आदींची ऊपस्थीती होती.