पुणे | अनैतिक संबंधातून महिलेचा गळा आवळून खून ; आरोपी बिहार मधून अटक; विमानतळ पोलिसांची कामगिरी

पुणे वार्ता – | अनैतिक संबंधातून महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 6 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली होती. महिलेचा खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह घरातील बाथरुममध्ये टाकून फरार झाला होता. पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला बिहार येथून अटक केली.

गुलाब मोहम्मद मुख्तार शेख (वय-32 रा. पठारे वस्ती, संत नगर लोहगाव, मूळ रा. बिहार ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत मयत महिलेच्या पतीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोझे आळी परिसरातील आरोपी गुलाब हा मयत महिलेच्या घरामध्ये भाड्याने राहत होता. दरम्यानच्या काळात त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. ही बाब मयत महिलेच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी आरोपीला घर खाली करण्यास सांगितले. घटनेच्या दिवशी दुपारी महिला घरामध्ये एकटी असताना आरोपी गुलाब हा घरी आला. त्यावेळी महिलेने अनैतिक संबंधास नकार दिल्याने त्याने तिचा बाथरुमध्ये गळा आवळून खून करुन फरार झाला असे फिर्यादीत नमूद केले आहे.

मोबाईल नंबरच्या तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे आरोपीचा तपास करत असताना तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप यांना आरोपी त्याच्या मुळ गावी बिहार येथे रेल्वेने पळुन जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांचे एक पथक बिहार येथे रावाना करण्यात आले. विशेष पथक व स्थानिक पोलीस यांनी आरोपीच्या घराभोवती सापळा रचला. पोलीस आल्याचे समजात आरोपी तेथून पळून जाऊ लागला. पोलिसांनी आरोपीचा सिनेस्टाईल पाठलाग करुन आरोपीला ताब्यात घेतले.

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे ,अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण ,पोलीस उपायुक्त रोहिदास पवार , सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप ,सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद पाठक ,पोलीस उपनिरीक्षक एस.ए. जाधव ,पोलीस अंमलदार रमेश लोहकरे, किरण खुडे, उमेश धेंडे, विनोद महाजन, किरण अब्दागिरे, रिहान पठाण, नाना कर्चे, रुपेश तोडेकर यांच्या पथकाने केली.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!