स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अभ्यासात सातत्य आवश्यक – धनंजय देशमुख
नेहरू युवा केंद्राच्या वतीने युवा सप्ताह निमित्ताने आयोजन
दर्यापूर – प्रतिनिधी महेश बुंदे
स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचे अनेक युवक व युवती यांचे स्वप्न असते. पण या क्षेत्रात यशस्वी तेच होतात जे आपल्या अभ्यासात सातत्य ठेवतात,शालेय जीवनात आपण जो अभ्यास केला तोच अभ्यास आपला स्पर्धा परीक्षा क्षेत्रात पाया मजबूत करतो, त्यासाठी अभ्यासाचे योग्य नियोजन, कठोर परिश्रम करण्याची तयारी आणि अभ्यासात सातत्य आवश्यक असल्याचे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व प्रसिध्द व्याख्याते धनंजय देशमुख यांनी केले. ते येवदा येथील कला वाणिज्य महाविद्यालयात नेहरू युवा केंद्र व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “स्पर्धा परीक्षा व करियर कॉन्सलिंग” या विषयावर बोलत होते. नेहरू युवा केंद्राच्या वतीने युवा सप्ताह निमित्ताने या स्पर्धा परीक्षा व आत्मनिर्भर भारत या दोन विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
