अमरावती – महेश बुंदे
राज्य सरकारी, निम-सरकारी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समितीने २३, २४ फेब्रुवारी रोजी पुकारलेल्या राज्यव्यापी लाक्षणिक संपात प्राथमिक शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे,राज्य सरचिटणीस विजय कोंबे, जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत यांनी केले आहे.
राज्य सरकारी, निम-सरकारी कर्मचारी, शिक्षकांचे अनेक प्रश्न शासनाकडे प्रदीर्घकाळ प्रलंबित आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद, नगर पालिका, महानगरपालिकांच्या शाळांतील विद्यार्थी, प्राथमिक शिक्षक आणि शाळांच्या संबंधाने असणाऱ्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आक्षेप राज्य प्राथमिक शिक्षक समितीने घेतला आहे.
विद्यार्थी आणि शिक्षकांच्या न्यायोचित मागण्यासाठी होणाऱ्या लाक्षणिक संपात जिल्हा परिषद, महानगर पालिका,नगर पालिकांच्या प्राथमिक शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राज्य नेते काळुजी बोरसे पाटिल,शिक्षक नेते शिवाजी साखरे,राज्य उपाध्यक्ष राजन कोरगांवकर, कार्याध्यक्ष राजेन्द्र नवले,कोषाध्यक्ष केदु देशमाने,संघटक सयाजी पाटिल,कार्यालयीन चिटणीस शिवाजी दुशिंग,संपर्क प्रमुख राजेन्द्र खेडकर,प्रवक्ता आबा शिंपी,प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर,आॅडीटर राजेन्द्र पाटिल,न.पा.मनपा आघाडी प्रमुख सुधाकर सावंत,महीला आघाडी प्रमुख सौ.वर्षा केनवडे,सरचिटणीस नलिनी सोनोने,अमरावती जिल्हा सरचिटणीस संभाजी रेवाळे,कार्याध्यक्ष मनिष काळे,महीला आघाडी प्रमुख सरीता काठोळे,सरचिटणीस योगिता जिरापूरे,कार्याध्यक्ष सुषमा वानखडे,कोषाध्यक्ष भावणा ठाकरे,तालुकाध्यक्ष उमेश चुनकीकर,छगन चौधरी,योगिराज मोहोड,सचिन राऊत,सुनिल बोकाडे,संजय बाबरे,राजेश ठाकरे,लक्ष्मीकांत देशमुख,शामकांत तडस,अजय पवार,विनोद पाल,प्रफुल्ल शेंडे,तुळशिदास धांडे,प्रफुल्ल वाठ,कीशोर वैराळे,अर्चना सावरकर,प्रियंका काळे,शैलेन्द्र दहातोंडे समस्त जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी केले आहे.
विविध मागण्या –