प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-मा. पोलीस अधिक्षक बच्चन सिंह नेहमीच पोलीस अधिकारी/अमलदार यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत कौतुकाची थाप देऊन सन्मानित करुन त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करीत असतात.

दिनांक २४/१२/२१ ते २६/१२/२१ या कालावधीत विदर्भ पॉवर लिफ्टिंग असोशिएशन नागपुर यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग प्रकारात वाशिम जिल्हयात कार्यरत महिला पोलीस अंमलदार ढोले ब.क्र १२०० आणि निलोफर बी शेख नशीर ब.क्र १४१६ यांनी सहभाग नोंदविला त्यात संगिता ढोले यांनी ४५ वेट कैटेगरी मध्ये एकुण २० खेळाडुपैकी १६५ स्फेटी टोलन पार करुन प्रथम क्रमांक प्राप्त करुन सुर्वण पदक पटकाविले तर निलोफर शेख यांनी ८४ वेट कॅटेगरी मध्ये एकुण ०५ खेळाडुमध्ये १९५५ स्फेटी टोलन पार करून द्वितीय क्रमांक प्राप्त करुन रौप्य पदक पटकाविले. पोलीस नाईक आशिष जयस्वाल बक्र ९३१ पोलीस मुख्यालय वाशिम यांनी दोन्ही खेळाडुना उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
