वाशिम:-वाशिम शेलुबाजार मार्गावर MH 48 पी 1445 महेंद्रा मॅक्झीमो नागपुर वरून लग्न आटपून परत येत असताना सोयता फाटा जवळ गाडीने उभ्या MH 37 V 3258 या ट्रॅक्टर ला जोरदार धडक दिली.
चारजन ठार झाल्याची माहीती मिळाली असुन यामध्ये नऊ जखमी झाले असुन चारजण गंभीर होते.अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व साळुंकाबाई राऊत महाविद्यालयाचे आपत्ती व्यवस्थापन पथक व पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक 108 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होऊन जखमींना वाशिम येथे रुग्णालयात हलविण्यात आले.