प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-दि.१५ फेब्रुवारी रोजी नियोजीत असलेल्या बंजारा समाजाची काशी समजल्या जाणार्या पोहरादेवीला दौर्यादरम्यान काॅग्रेसचे महाराष्ट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मंगरुळपीर काॅग्रेस कमेटीने मंगरुळपीर येथील मानोरा चौकात भव्यदिव्य स्वागत केले.

पोहरादेवीला नियोजीत दौर्यात जात असतांना काॅग्रेसचे लोकप्रिय दिलीप मोहनावाले यांच्या आग्रह आणी विनंतीखातर मानोरा चौकात मान्यवरांचा स्वागत आणी सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.दुपारी बाराच्या सुमारात पोहरादेविकडे जाणारा नाना पटोले यांचा ताफा मानोरा चौकात थांबला.तिथे पुर्वनियोजीत कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती.
