ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदव्युत्तर पदवीसाठी निवड ; धावंडा येथील होतकरू विद्यार्थ्यांने वाढविले गावाचे वैभव

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम:-मानोरा तालुक्यातील धावंडा येथील विद्यार्थी वैभव पांडुरंग बळी ह्या पहिली ते पाचवी पर्यंत गावात मराठी माध्यमातून शिक्षण झालेल्या विद्यार्थ्याने वैद्यकीय शिक्षण विभागात पदव्युत्तर (एम.डी.) पदवीसाठी प्रवेश मिळविल्याने ग्रामवासियांकडून सातत्य आणि मेहनत करण्याच्या वैभवच्या गुणाचा कौतुक केला आहे.

शिक्षणामध्ये हुशार असलेले वैभव होणे ६ वी ते १२ वी पर्यंत जवाहर नवोदय विद्यालय तीर्थक्षेत्र शेगाव येथे पूर्ण करून वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक असलेली नीट परीक्षेत यश मिळवीले आणि महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालय वर्धा येथे एमबीबीएसची पदवी पूर्ण केली आहे.इंटर्नशिप करीत असतांना एमडी साठी आवश्यक असलेली तयारी करून निन परीक्षेत सुद्धा वैभवने उत्तुंग यश प्राप्त करून बालरोगतज्ञ या विषयासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रम वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथे निवड झाल्याने धावंडा वासियांतर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

सत्कार प्रसंगी सरपंच प्रकाश जाधव, अशोक पाटील, भुजंगराव राऊत, संतोष कोल्हे, संतोष पुसांडे, विठ्ठल सातपुते, माणिक खटारे,यशवंत महाराज आणि गावातील ग्रामस्थ व आदिवासी बांधव सत्कार प्रसंगी हजर होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!