कालवा कागदोपत्री दुरुस्त करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी ; गळक्या कालव्यामुळे शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे नुकसान होत असल्याची तक्रार

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम:-मंगरूळपीर तालुक्यातील तीर्थक्षेत्र सावरगाव कान्होबा येथे अनेक शेतकऱ्यांना धरण कालव्याच्या थातूरमातूर दुरुस्ती व देखभाल यामुळे पाणी उभ्या पिकात शिरून पिकाची वर्षानुवर्षे नासाडी होत असल्याची तक्रार जलसंपदा विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सावरगाव कान्होबा येथील शेतकरी गोवर्धन सूर्यभान राठोड यांनी जलसंपदा मंत्र्यांना दिलेल्या निवेदनामध्ये त्यांची व त्यांचे थोरले भाऊ स्व.रामधन राठोड आणि प्रल्हाद सूर्यभान राठोड यांची ग. नं. ८६ अ. ब. क. जवळपास दहा एकर शेती या गावातील धरणाच्या मुखाशी आहे.

धरणाचे पाणी सिंचनासाठी शेतकऱ्यांना मिळावे यासाठी शासनाद्वारा निर्मित करण्यात आलेल्या कालव्याचे पाणी मोठ्या प्रमाणात पाझरून शेतशिवारात पंचवीस ते तीस वर्षापासून उभ्या पिकात घुसत असल्याने शेत जमिनीची पोत बिघडून दरवर्षी प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे बाधित शेतकऱ्याचे म्हणणे आहे.सावरगाव का. येथील धरण वर्षानुवर्षे ज्या प्रशासकीय विभागाकडे होते त्यांच्याकडून व या वर्षी ज्या मृदा व जलसंधारण विभागाकडे आहे त्यांच्याकडूनही कालवा दुरुस्ती व देखभाल पारदर्शकपणे करण्यात न आल्याने मागील अनेक वर्षां सारखीच यावर्षी सुद्धा कालव्याचा मोठा प्रवाह कलवा व्यवस्थित दुरुस्त न केल्याने पिकात येऊन नुकसान होत असल्याचे निवेदन शेतकऱ्याने दिले आहे.

तीनही कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे मुख्य स्रोत ही शेती असून शेतकऱ्यांना बिकट प्रसंगांना सामोरे जावे लागत असल्याचे सर्वविदीत असतांना कंत्राटदारां मार्फत कागदोपत्री दुरुस्ती योजना राबविणाऱ्या जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांवर व संबंधित कंत्राटदारावर कायदेशीर व दंडात्मक कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!