मा. तुषार भारतीय यांच्या प्रयत्नातून हनुमान मंदिर नवीन सातुर्णा नगर ते चिखलकर भाजी रोड पर्यंत
अमरावती वार्ता:- काही दिवसापासून अमरावती महानगरपालिकेमध्ये शाही फेक प्रकरण गाजत असताना अमरावती महानगरपालिकेतील विकासपुरुष म्हणून संबोधित माननीय तुषार भारतीय यांच्या प्रयत्नातून आज अनेक वर्षापासून रखडलेले रस्त्याचे काम हे सुरू करण्यात आलेले आहे या रोड वरून दररोज बडनेरा रोड वरून आत असलेले क्रांती कॉलनी व अमरावती नवीन रेल्वे स्टेशन कडे जाणार रस्ता अत्यंत दयनीय परिस्थितीत झाला होता.
भूमिपूजन करताना व्हिडिओ
या रोडचा पाठपुरावा स्वराज वार्ता जिल्हा प्रतिनिधी जयकुमार बुटे यांच्या नेतृत्वात मनोज कुकडकर धीरज वंजारी दीपक चोरपगार सचिन येरोने गजानन दुर्गे राजूभाऊ गेडाम दीपक पाटील राजू जगताप दीपक गुंडा मारुती भगत विनोद रघुवंशी यांनी पाठपुरावा केल्यानंतर माननिय तुषार भारतीय आणि अमरावती महानगरपालिका महापौर व स्थानिक नगरसेवक चेतन भाऊ गावंडे रेखा भुतळा त्यांच्यामार्फत पाहणी केल्यानंतर कामाला सुरुवात झाली आहे .
प्रतिक्रिया व्यक्त करताना व्हिडिओ
तुषार भारतीय यांची व बाकी नगरसेवकचि सेवा 8 मार्च पर्यंत कार्यकाळ संपत आहे तरी यांच्याकडून जास्तीत जास्त कामे कसे होणार या प्रयत्नांमध्ये तुषार भाऊ नेहमी अग्रेसर असतात त्यांच्याकडून कोणती कामे राहू नये हे प्रयत्न करत असतात सातुर्णा संपूर्ण नगरमधील मधील अंतिम टप्प्याचे काम पूर्ण करण्यात येत आहे त्यामुळे नवीन सातुर्णा नगर येथील जनतेने तुषार भारतीय यांचे आभार व्यक्त केले व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या यापुढे आम्हाला हेच नगरसेवक राहो अशी इच्छा व्यक्त केली.