चाकण वार्ता :- सतत होणाऱ्या वाहतूक कोंडी मुळे दि. १२/०२/२०२२ चाकण वाहतुक विभाग हद्दीतून राष्ट्रीय महामार्ग शिक्रापुर ते तळेगांव, (एन.एच ५४८ डी) व पुणे ते नाशिक (एन.एच.६०) येत असुन सदर राष्ट्रीय महामार्गावरून मोठया प्रमाणात प्रवाशी व | अजवड चाहने जात असल्याने वारंवार चाकण व माणिक चौकात वाहतुक कोंडी होत असल्याने वाहतुक कोंडी टाळण्यासाठी खालील प्रमाणे एकेरी वाहतुक करणे आवश्यक असल्या कारणाने.
पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुक सुरक्षित व सुरळीतपणे होणेकरीता, महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र. एम. व्ही. ए. ०१९६/८७१/सी आर ३७/टी आर ए २, दिनांक २७/०९/१९९६ चे नोटीफिकेशन नुसार मोटार वाहन कायदा कलम ११५ ११६(१) (ए) (बी), ११६(४) आणि ११७ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन ट्रॅफिक आयुक्त आनंद भोईटे, पोलीस उप-आयुक्त वाहतुक शाखा, पिंपरी चिंचवड शहर, यांनी यापूर्वी काही निर्बंध असतील ते रद्द करण्यात येत असुन खालील प्रमाणे तात्पुरते स्वरुपात आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
चाकण वाहतूक विभाग अंतर्गत
शिक्रापुरकडून चाकणकडे येणारे सर्व प्रकारची वाहने मुंबईकडे जाण्यासाठी माणिक चौकातून डावी कडे वळून मुटकेवाडी चौक बंगला वस्ती आळंदी फाटा स्पायसर चौक- निघोजे डॉगर वस्ती – इंडुरन्स चौक- एच.पी. चौक मार्गे मुंबईला जातील.
पुण्याला जाणारी वाहने माणिकचौक मुटकेवाडी चौक बंगला बस्ती आळंदी फाटा -स्पायसर चौक -मोशी मार्गे पुण्याला जातील.
तसेच माणिक चौकाकडून येणारी वाहने ही मुटकेवाडी चौकातून युटर्न करून तळेगाव चौकातून इच्छित स्थळी जातील.
मुटकेवाडी ओढाकडून माणिक चौकाकडे जाण्यास सर्व वाहनांना बंदी करण्यात येत असुन यासाठी नाणेकरवाडी अंडरपासचा वापर करण्यात यावा.
तरी नागरीकांनी वरील प्रमाणे मार्गाचा वापर करावा. वरील प्रमाणे चाकण वाहतुक विभाग अंतर्गत सकाळी ०७.०० ते २४.०० वाजे पर्यंत एकेरी वाहतूक करणेबाबत अधिसुचना (नोटीफिकेशन ) काढण्यात येत आहे. सदरचे अधिसुचना वाहतूक फेरबदल अमंलबजावणी सोमवार १४ फेब्रुवारी २०२२ पासुन प्रायोगिक तत्वावर करण्यात येत आहे.
यावेळी ट्रॅफिक पोलीस आयुक्त आनंद भोईटे ,चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे, मा.नगरसेवक धीरज मुटके, ट्रॅफिक पोलीस निरीक्षक गोडसे, उपनिरीक्षक चौरे, डावरे मॅडम व वाहतूक विभाग पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.