मेसोमाता मंडळाचा अनोखा उपक्रम ; विधवा महिलांना दिल्या जाते साडी चोळी

दर्यापूर – महेश बुंदे

दरवर्षी प्रमाने हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे मेसोमाता मंडळ माहोली धांडे तर्फे आयोजन केल्या जाते, परंतु एक वर्ष कोरोना निर्बंधामुळे खंडित पडले असतांना या वर्षी पुर्ववत  दि. १२ फेब्रुवारी २०२२ ला करण्यात आले. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे, ज्यांना हिंदु कार्यपद्धती मध्ये विधवा महिलांना शुभ प्रसंगात प्राधान्य दिले जात नाही तिथे या मंडळा मध्ये विधवा महिलांना प्राधान्य दिलं जात.

मेसोमाता महिला मंडळाच्या अध्यक्षा व उपाध्यक्ष सुद्धा विधवाच असल्यामुळे त्यांना सौभाग्य वतीची साथ, त्यामुळे त्या कार्यक्रमाला माहोली गावातील महिलांचा सहभाग वाखाणण्याजोगा असतो. अतोनात कष्ट करुन ज्या महिलांनी संसाराचा गाडा उपाशी तापाशी, शेतीचे कामे करुन चालविला अशा विधवा महिलांना लुगळी, चोळीने गौरविण्यात आले, त्याचबरोबर ज्या महिला कमी वयात विधवा होउन तिच्या लहान मुलांसाठी पुर्ण आयुष्य डावावर लावत आहेत अशा संस्कारित स्त्रीयांना सुद्धा गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. पुष्पा शंकरराव साखरे, प्रमुख पाहुने म्हणून डॉ. अशफिया पठान संचालक एकता हॉस्पिटल दर्यापुर, माजी सरपंच शेलु बोंडे, सौ. उज्वला बोंडे, पंचायत समिती उपसभापती दर्यापुर, सौ. रेखा साखरे, अटाळकर, ग्रामपंचायत सदस्या, सौ. बाली गणेश बरडे, उपस्थित होते, सदर कार्यक्रमाचे आयोजक मेसोमाता मंडळाचे महिला कार्यकर्त्यां
गभा, माया रमेश बरडे, सौ. माया राजु वर्मा, अनिता मोहन बरडे, सौ. उषा प्रल्हाद चव्हान, सौ. पुष्पा भानुदास नांदने, सौ. उमा संतोष सोळंके, सौ. सुरेखा धनराज बरडे, सौ. कुसुम अशोक बरडे यांच्या उत्कृष्ट नियोजनातुन व असंख्य माहोली गावातिल महिलांचा सहभागातुन यशस्वीरित्या संपन्न झाला.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!