प्रतिनिधी कुणाल शिंदे
चाकण वार्ता:- खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये आज शनिवारी झालेल्या आठवडे बाजारात कांद्याची आवक ५०० क्विंटलने वाढल्याचे पाहायला मिळाले. तसेच कांद्याचे भावात कमाल ५०० रुपयांची वाढ झाली.तसेच तळेगाव बटाट्याची आवक २००० क्विंटलने कमी झाल्याने दरात २००रुपयांची वाढ झाल्याची पाहायला मिळाली. तसेच हिरवी मिरची,वटाणा,गाजराची आवक भाजीपाला बाजारात मोठ्या प्रमाणात आज झाली.

आज भाजीपाला बाजारात कोथिंबीर ३४,२५० व मेथीच्या ३८,५२० जुड्यांची मोठ्या प्रमाणात आवक भाजीपाला बाजारात झाल्याने कोथंबीरीच्या भावात मोठी घसरण झाली. आज मार्केटच्या भाजीपाला बाजारात मेथीच्या भाजीला २ रुपयांपर्यंत, कोथिंबीर जुडीला १ , शेपु भाजीला ४,पालक भाजीला २ रुपये एवढा कमी दर पाहायला मिळाला.मात्र बाजारात हिरवी मिरची,गाजर, वटाणा,व आवक वाढून देखील भावात कडाडले. भाजीपाला बाजारात कोथिंबीर,पालक भाजीला दरात मोठी घसरण झाल्याने उत्पादन खर्च, गाडी भाडे ,औषधे मजुरी देखील निघत नसल्याने शेतकऱ्यांवर फेकून देण्याची वेळ आली.

अनेक शेतकऱ्यांनी कोथंबीर जागेवरच सोडुन दिल्याने मोठा ढीग मार्केटमध्ये दिसत होते.मात्र काही शेतकऱ्यांनी किरकोळ बाजारात कोथिंबीर,मेथीच्या, पालक भाजीची विक्री केल्याने चांगला दर मिळालेला पाहायला मिळाला.खेड तालुक्यातील ग्रामीण भागात रब्बी हंगाम संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीकाचे उत्पादन घेतले जाते. चाकण मार्केटयार्डमध्ये देखील कांद्याचा मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने मोठी उलाढाल पाहायला मिळते.तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कांदा पिकाचे लागवड केली. परंतु बदलते हवामान,अवकाळी पाऊस यामुळे अनेक शेतकऱ्यांचे कांदा पिकाची नासाडी झाली.त्यामुळे कांदा पिकाची आवक कमी जास्त प्रमाणात होत असलेली पाहायला मिळत आहे.

मागील शनिवारच्या तुलनेत कांद्याची ५०० क्विंटलने वाढुन झाल्याने कांद्याचा भाव वधारून कमाल ३१०० रुपयांवरून किमान १५०० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल पर्यंत ५०० रुपयांची वाढ होऊन पोहचला.व तळेगाव बटाट्याची आवक २००० क्विंटलने कमी झाल्याने भाव देखील प्रतिक्विंटलने 200 रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळाली. बटाट्याचा भावात कमाल १५०० ते १००० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल काही प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच चाकण भाजीपाला मार्केट यार्डमध्ये ,हिरवी मिरची,कोबी,फ्लॉवर, वटाणा,गाजर,टोमॅटो मोठ्या प्रमाणात आवक झालेली पाहायला मिळाली.

तसेच भाजीपाला बाजारात गवार, वांगी, शेवगा, चवळी, दोडका,भाजीची आवक घटल्याने भाव कडाडले आहेत.लसणाची देखील २५ क्विंटल आवक होऊन भावात १००० रुपयांची वाढ झाली..आज झालेल्या आठवडे बाजाराची एकुण उलाढाल 32 लाख रुपये इतकी झाल्याचे पाहायला मिळाली.
