दर्यापूर – प्रतिनिधी महेश बुंदे
अमरावती वार्ता :- दर्यापूर नगरपरिषद हद्दीमधील ड्रीम लँड सिटी परिसरातील वृंदावन कॉलनी येथील श्री गजानन भक्तांनी सुंदर असे श्री गजानन महाराजांचे मंदिर उभारले असून त्याचे उद्या दिनांक १३ फेब्रुवारीला श्री गजाननाची सुंदरशी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून त्या निमित्ताने आज शहरातून सुंदर अशी शोभायात्रा काढण्यात आली होती.

सर्व महिलांनी पुरुषांनी भगवे फेटे परिधान केले होते, संध्याकाळी सामदा कासंपुर येथील ह भ प भांडे महाराज यांचे जाहीर कीर्तन झाले, त्याच परिसरात सर्वांचे लक्ष वेधून घेणारी कुमारी सुनिता साखरे हिने रंगीत रांगोळी द्वारे श्रीची प्रतिमा साकार केली असून ते सर्व गजानन भक्तांचे आकर्षण डोळ्याचे पारणे फेडनारी आहे.
