शासनाने प्रतिबंधीत केलेले बायोडिझेलची काळ्या बाजाराने विक्रीसाठी जाणारे दोन कंटेनर सह एकुण ७२,६९,८००/- रू.च्या मुद्देमालासह दोघांना अटक ; चाकण पोलीस स्टेशन डि. बी. पथकाची कामगीरी

पिंपरी-चिंचवड/चाकण वार्ता :- विक्रीसाठी चोरुन बायोडिझेल वाहतूक करणाऱ्या आरोपींना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या कडून 22.69 लाख रुपये किंमतीचे बायोडिझेल आणि 50 लाख रुपये किंमतीचे दोन ट्रक असा एकूण 72.69 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पहा कारवाई व्हिडिओ

चाकण पोलीस स्टेशन हद्दीत बायोडिझेलची नाव्हा शेवा येथुन अवैधरित्या चोरून विक्री करण्याचे उददेशाने औरंगाबाद येथे दोन ट्रकचे कंटेनर मध्ये बायोडिझेल वाहुन नेणार आहेत, अशा आशयाची माहिती मिळाल्याने चाकण पोलीस स्टेशन कडील गुन्हे शोध पथकातील स.पोनि प्रसंन्न ज-हाड, सपोनि विक्रम गायकवाड, पोहवा ऋषीकुमार झनकर, संदिप सोनवणे, पोना हनुमंत कांबळे, मच्छिंद्र भांबुरे, पोकॉ प्रदिप राळे यांनी चाकण शिकापुर रोडवर शेलपिंपळगाव येथे सापळा रचुन १) कंटेनर क एम एच ४३ वय ३५७५ व २) एम एच ४३ वाय ३५६९ हे दोन कंटेनर ताब्यात घेतले.

शेलपिंपळगावच्या हद्दीत चाकण शिक्रापूर रोडवरती शुक्रवारी (दि.11) पहाटे तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यात राजू ज्ञानदेव गिते (वय 28), विठ्ठल भानुदास सोनवणे (वय 33) (दोघेही रा. आष्टी, बीड), कंटेनर मालक निवृत्ती भानुदास गर्जे (रा. ठाणे), ब्रोकर विठ्ठल म्हस्के (रा. न्हावा शेवा) आणि बायोडिझेल वाहतूक व साठवणूक करणारे इतर लोकांना अटक करण्यात आली आहे.

अन्न धान्य वितरण अधिकारी, पुरवठा निरीक्षक गणेश सुभाष रोखडे (वय 44) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रतिबंधित बायोडिझेल विक्री साठी घेऊन जात होते. दोन्ही ट्रकची पडताळणी केली असता त्यात 22.69 लाख रुपये किंमतीचे 37 हजार 830 किलो ग्रॅम बायोडिझेल आढळून आले. पोलिसांनी MH 43 Y 3575 व MH 43 Y 3569 असे दोन्ही ट्रक जप्त केले आहेत. कारवाईत एकूण 72.69 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश साहेब, अपर पोलीस आयुक्त श्री. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- १ श्री. मंचक इप्पर, सहा. पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलीस निरीक्षक अनिल देवडे, स.पोनि प्रसंन्न ज-हाड, स.पोनि विक्रम गायकवाड, सफौ सुरेश हिंगे, अदिनाथ नागणे, पो.हवा ऋषीकुमार झनकर, संदिप सोनवणे, पो.ना हनुमंत कांबळे, भैरोबा यादव, मच्छिंद्र भांबुरे, दत्ता पाषानकर, पो.कॉ प्रदिप राळे यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास स.पोनि प्रसंन्न ज-हाड चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!