पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ व चाकण पोलीस ठाणेची संयुक्ती कामगिरी ; अडीच महीन्याच्या प्रदिर्घ तपासानंतर खुनाच्या गुन्हयाची उकल

पुणे वार्ता दि.(12 फेब्रुवारी2022) :- दिनांक ३०/११ / २०२१ रोजी आळंदी घाटामध्ये एक अनोळखी इसमाची डेड बॉडी मिळुन आलेली होती. सदर मयत बॉडीची ओळखपटवित असताना सर्व पोलीस ठाणे हददीतील मिसिंग रजिस्टर चेक करुन माहीती मिळाली की, सदर मयत इसमा बाबत म्हाळुंगे चौकी चाकण पोलीस ठाणे मानव मिसिंग रजिस्टर नं.३०७ / २०२१ प्रमाणे दाखल असल्याबाबत माहीती मिळाली होती. त्यामधील मयत इसम राधेशाम सुभाष राठी वय-45 वर्षे, रा. इंद्रायणीनगर, आळंदी गल्ली नंबर 4, देहुफाटा मोशी रोड ता. हवेली जि. पुणे मुळ रा. काटाकोंडाळा ता. वाशिम जि. वाशिम याची असले बाबत खात्री झाली त्यावेळी मयताची मोटर सायकल व मोबाईल मिळून आलेला नव्हता सदर सदर बाबत आळंदी पोलीस ठाणे येथे अकस्मात मयत रजि. नं.९०/२०२१ सी.आर.पी.सी. १७४ प्रमाणे दाखल झाले होते.

तरी दाखल मयताचे कागदपत्राचे चौकशी करुन दिनांक ३१/१२/२०२१ रोजी आळंदी पो.स्टे. गु.र.नं. २९८ / २०२१ भा.दं.वि. कलम ३०२ प्रमाणे अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.

सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त गुन्हे व शंकर बाबर वपोनि गुन्हे शाखा युनिट ३ वपोनि रामदास इंगवले अतिरिक्त कार्यभार युनिट ३ यांचे मार्गदर्शना खाली युनिट ३ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना वेगवेगळ्या टिम तयार करून गुन्हा उघडकीस आणण्याकरीता मार्गदर्शन सुचना दिलेल्या होत्या.

सदर मिसिंग दाखल कालावधी व भयत गुन्हा दाखल कालावधी मध्ये बराचसा कालावधी गेल्याने तसेच सदरचे घटनास्थळ आळंदी घाटामध्ये निर्जन व सदर ठिकाणी मोबाईलची रेंज नसल्याने तपासामध्ये तांत्रिक दृष्टया अनेक अडचणी येत होत्या. सदर गुन्हयामध्ये सर्व बाजुने सखोल तपास केला असता काही एक निष्पन्न होत नव्हते.

मयत इसम कामाला असलेल्या बंडी इंडीया कंपनी, कुरुळी या ठिकाणी तपास केला असता मयत हा दिनांक २६/११/२०२१ रोजी रात्री ११. वा. घरी आळंदी येथे जाण्याकरीता बाहेर पडल्याचे माहीती मिळाली त्यावेळी घरी जाणा-या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता आळंदी फाटा चाकण येथे पर्यंत मयत इसम मोटर सायकलवरती जात असताना दिसत होता परंतु पुढील घाट परीसरामध्ये सीसीटीव्ही फुटेज नसल्याने काही एक उपयुक्त माहीती मिळालेली नाही.

मयताचे बाबत नातेवाईक, कंपनी यामध्ये चौकशी केली असता मयताचे कुणाशीही वैर नसल्याबात माहीती मिळाली होती मयताचा मोबाईल बाबत तांत्रिक दृष्टया तपास केला असता काही एक उपयुक्त माहीती मिळत नव्हती त्यावेळी सर्व प्रकारचे पर्यायी मार्ग संपले असताना मयताचे वाहनाबाबत सखोल तपास करीत असताना पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे यांनी सदर वाहनावर गुन्हा घडले नंतर कोणते चलन पडले आहे का याबाबत दररोज पाठपुरावा करीत असताना दिनांक ०३/१२/२०२१ रोजी मयताचे वाहन क्रमांक एमएच १४ डी डी ३२४७ यावरती ट्रीपल सीट बाबत चलन पडल्याबाबत माहीती मिळाली तेव्हा मयताचे वाहनावरील ट्रीपल सीट असणारे इसमांचा वाहनाचे पाठीमागील बाजुचा फोटो प्राप्त झाला व तो पाठीमागील बाजुचा असल्याने त्यामध्ये चेहरे अर्धवट दिसत असल्याने व बराच कालावधी गेल्याने परीसरातील १५० सीसीटीव्ही फुटेज चेक केले. परंतु कोणतीही उपयुक्त माहीती मिळत नव्हती. त्यावेळी सदरचे चलन हे चाकण पोलीस ठाणे हददीत झाल्याने सदरचा इ चलन फोटो हा चाकण पोलीस ठाणे कडील डीबी पथक यांना देण्यात आलेला होता.

दिनांक ११/०२/२०२२ रोजी पो. उपनि. विजय जगदाळे व पोशि/ १९४० हनमंते यांना बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, मयताचे गाडीवरील पाठीमागील बाजुस बसलेला इसमा नाणेकरवाडी चाकण येथील असल्याबाबत खात्रीशीर माहीती मिळाली असता वपोनि रामदास इंगवले यांनी सदर बातमीची खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले असता सदर बातमीची खातरजमा करणेकामी पो उपनि. विजय जगदाळे व पोलीस स्टाफ यांनी नाणेकरवाडी येथील ठाकरवस्ती चौक येथे सापळा रचला असता सदर इसम त्या ठिकाणी आला त्यास चलन मधील फोटो दाखविला असता त्याने मागील बसलेला इसम हा मीच असले बाबत सांगितले तेव्हा त्यास इ चलन मधील गाडी कोठे आहे असे विचारले असता त्याने त्या बाबत समाधान कारक उत्तर दिले नाही त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव व पत्ता पृथ्वीराज नामदास वय 19 वर्षे रा. नाणेकरवाडी, तालमी जवळ, पावडे यांचे खोलीत, ता.खेड जि. पुणे मुळ रा. भवानी नगर बारामती, जि. पुणे असे असल्याचे सांगितले त्यावेळी त्याचेकडे सखोल तपास केला असता त्याने सांगितले की, “दिनांक 26/11/2021 रोजी रात्री 11.00 वा. चे दरम्यान आळंदी घाटा मधुन मी व माझा मित्र तेजस संतोष लोंढे रा. भुजबळ आळी चाकण ता. खेड जि. पुणे असे लुटमारीचे इरादयाने मोटर सायकवरील इसमास आडवुन त्याचेकडील दोन हजार रुपये रोख रक्कम व मोबाईल तसेच त्याची मोटर सायकल बळजबरीने काढुन घेवून त्याने प्रतिकार केल्याने त्यास त्याचे डोक्यामध्ये दगडाने व रॉडने मारहाण करून त्याचा खुन करुन त्याची बॉडी रोडचे कडेच्या चारी मध्ये टाकुन दिली असल्याबाबत कबुली देवून मयताकडील रोख रक्कम, मोबाईल, मोटर सायकल घेवून पळुन गेल्याबाबत माहीती दिली आहे” तसेच आरोपी नामे तेजस संतोष लोंढे रा. भुजबळ आळी चाकण ता.खेड जि.पुणे यास चाकण पोलीस ठाणेकडील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी त्यास ताब्यात घेवून आळंदी पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.

अशाप्रकारे अनोळखी मयताची ओळख पटवून अज्ञात आरोपी बाबत काही एक सुगावा नसताना युनिट 3 कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कौशल्यपुर्ण सर्व प्रकारे तांत्रिक दृष्टया तपास करुन अडीच महीन्या नंतर क्लीष्ट गुन्हा उघडकीस आणला आहे. सदरचे आरोपींना रिपोर्टसह आळंदी पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश मा. अपर पोलीस आयुक्त श्री. शिंदे, पोलीस उपआयुक्त परीमंडळ 1 मंचक इप्पर, मा.पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. डॉ. काकासाहेब डोळे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे), डॉ. प्रशांत अमृतकर, सहा. पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, चाकण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर वरीष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले अतिरीक्त कार्यभार युनिट 3 व पो.नि वैभव शिनगारे चाकण पोलीस ठाणे, पो.नि अनिल देवडे, गुन्हे, स.पोनि प्रसन्न ज-हाड ,स.पो.नि विक्रम गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले यदु आढारी, सचिन मोरे, विठठल सानप, नागेश माळी, रूपीकेश भोसुरे, अनिल लांडे, महेश भालचिम, सागर जैनक, योगेश्वर कोळेकर, राजकुमार हनमंते, त्रिनयन बाळसराफ, राहुल सूर्यवंशी, रामदास मेरगळ, सुधिर दांगट, समीर काळे, शशिकांत नांगरे, निखील फापाळे चाकण पोलीस ठाणे कडील अंमलदार पोहवा झणकर, पो.हवा / सोनवणे, पो.ना/ कांबळे, पो.ना. भांबुरे, पो.शि/राळे यांनी केली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!