दर्यापूर – महेश बुंदे
तालुक्यातील येवदा येथे आदिवासी क्षेत्रातील स्थंलातरीत आदिवासी लाभार्थ्यांना पोषण व आरोग्य सुविधा देण्यात आली. दिनांक १० फेब्रुवारी २०२२ रोजी येवदा येथुन जवळच असलेल्या विट भट्टिवर आरोग्य तपासणी व पोषण आहार कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमात येवदा येथील वैद्यकीय अधिकारी पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रशांत आढाऊ, श्रीमती कोमल बारोकार, वैद्यकीय अधिकारी त्याचप्रमाणे श्रीमती चंद्रकला खेडकर, पर्यवेक्षिका तसेच आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशासेविका, मदतनीस उपस्थित होत्या. या कार्यक्रमात लसीकरण व आरोग्य तपासणी, व्हिटॅमिन, गरोदर माता नोंदणी, मुलांचे वजन, उंची तसेच कोविड लसीकरण मातांना प्रात्याक्षिक शेवग्याच्या पानांची भाजी, पराठे अशा पोषण आहार यावेळी देण्यात आला.

