मनभरुन हसा,जिवनाचा आनंद लुटा
कवयिञी कु.राधिका
प्रतिनिधी फुलचंद भगत
मन भरून रुसून असच हसायचं आहे
निरागस भावनांचे मोल दर्शवायचे आहे
अबोल चेहऱ्याला बोलक करायचं आहे
हे अनावरलेल हास्य जपून ठेवायचं आहे
हरवलेल्या भानाला जागृत करायचं आहे
बागळलेला प्रसन्नपना सावरायचा आहे
बस हसायचं आहे मन मोकळेपणाने
आयुष्य भरून टाकायचं आहे स्वप्नाने
आकांशाची स्पूर्ती धरून स्पंदने गाठायची आहे
हुदयात आपुलकी ठेऊन माणुसकी जिंकायची आहे
चेहऱ्यावर उमललेले हे तेज कायम ठेवायचं आहे
कारण या चेहऱ्याला सदैव हसवायच आहे
आगळ्या वेगळ्या विचारांना एकत्र करून एकतत्वावर जगायचं आहे
संकोच मनाचा दूर करून बस मनभरून हसायचं आहे
कारण आयुष्य अजून भरपूर राहलं
हसून त्याचा आस्वाद लुटायचा आहे
-कवयिञी कु.राधिका गजानन सावके