अमरावतीत आयुक्तांवर शाईफेक प्रकरणी पाचही आरोपींना १३ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी..

प्रतिनिधी ओम मोरे :-

युवा स्वाभिमान कार्यकर्त्यावर ३०७ कलमान्वये गुन्हा

अमरावतीत राजकीय वाद चिघळला : पाचही आरोपींना १३ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीशहरातील राजापेठ उड्डाणपुलाच्या भुयारी मार्गात सांडपाणी साचत असल्याच्या माहितीवरून पाहणीसाठी आलेले महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर तीन महिलांनी अचानक धाव घेत शाई फेकली. कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या वाहनांचा टायर फोडण्याचा प्रयत्न केला आणि पेचकचने त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्नदेखील केल बुधवारी दुपारी १ च्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी आयुक्तांच्या तक्रारीवरून पोलिसांनी १० जणांविरुद्ध गुन्हे नोंदविले.

पहा घटनेचा व्हिडिओ

याप्रकरणी आता आमदार रवी राणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजापेठ उड्डाणपुलावर विनापरवानगी स्थापित केलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविल्याची पार्श्वभूमी या घटनेमागे असल्याचे बोलले जात आहे. ‘आम्ही समस्त शिवप्रेमी’ आणि युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी १२ जानेवारी रोजी राजापेठ उड्डाणपुलावर शिवरायांचा पुतळा बसविला होता. महापालिकेने १६ जानेवारीच्या मध्यरात्री हा पुतळा हटवून ताब्यात घेतला. तेव्हापासून आमदार रवि राणा विरुद्ध प्रशासन असा बाद पेटला आहे. ही बाब आ. रवि राणा यांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, भाजप गटनेते तुषार भारतीय आदींना लक्ष्य केले. याप्रकरणी आयुक्तांवर झालेल्या शाईफेकीच्या हल्ल्यानंतर आता रवि राणांविरुद्ध कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!