प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- अखंड हिंदुस्थानचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जुन्नर येथील शिवनेरीला भेट देण्यासाठी अनेक शिवभक्त,पर्यटक, हे देशाच्या कानाकोपऱ्यातुन येत असतात.परंतु या शिवरायांच्या जन्मभूमीला भेट देण्यासाठी आता पीएमपीएमल कडुन बससेवा आजपासुन सुरू करण्यात आली आहे.भोसरी ते जुन्नर पीएमपीएमल पहिली बस आज सकाळी 11 वाजता रवाना झाली.या बसचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.त्यानुसार भोसरी येथून जुन्नरला बस धावणार आहेत.

या बससेवेच्या संदर्भात आमदार अतुल बेनके यांनी पाठपुरावा केला होता.त्यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले असून जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी व पीएमपीएमएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून देखील त्यांनी बस सेवा सुरू करण्यासाठी प्रतिसाद दिला. तसेच या मार्गावर अष्टविनायकापैकी दोन गणपती तीर्थक्षेत्रे जुन्नर तालुक्यात येत असल्याने दर्शनासाठी गणेश भक्तांची ये-जा करत असतात.या बस सेवेचा शुभारंभ आजपासुन भोसरी येथूनसुरू करण्यात आला.भोसरी ते जुन्नर पहिली बस सकाळी अकरा वाजता भोसरी डेपोतून सोडण्यात आली. त्यामुळे या बससेवेचा फायदा शिवभक्तांना, नागरिकांना, शाळेतील मुलांना, पर्यटकांना ,गणेश भक्तांना होणार आहे
भोसरी ते जुन्नरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी पीएमपीएमल कडुन वेळापत्रक जाहीर केले आहे.खालील वेळेत बस सुटणार आहेत याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.
भोसरी येथुन…
सकाळी ५.३० मिनिटांनी
सकाळी ८.२५ मिनिटांनी
दुपारी १.५० मिनिटांनी
सायंकाळी ५.३० मिनिटांनी
सायंकाळी ७.३५ मिनिटांनी
जुन्नर येथुन…
सकाळी ६.३० मिनिटांनी
सकाळी ९.३० मिनिटांनी
दुपारी १२.३० मिनिटांनी
सायंकाळी ६.०० मिनिटांनी
रात्री ९.०० मिनिटांनी
या वेळेस बस सुटणार आहेत.