दर्यापुर – महेश बुंदे
दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस स्टेशन अर्तंगत येणाऱ्या डोंबाळा गावातील २५ वर्षीय तरुणीने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना दि. १० फ्रेब्रुवारी गुरवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. सदर घटना प्रेमसंबधातून झाली असल्याची लेखी तक्रार पोलीसांना दिली असल्याची माहिती कुटुंबातील सदस्यांनी दिली आहे.

सुवर्णा राजेंद्र गवई (वय.२५) असे मुतक युवतीचे नाव आहे. सदर तरुणी कोकर्डा येथील खाजगी दवाखान्यात परिचारिका म्हणून काम करीत होती. मुतक सुवर्णा आपल्या घरुन सकाळी ८ वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे दवाखाण्यात कामास गेली व तिथेच तिने विष प्राशन केले. हि बाब तेथील काही जणांच्या लक्षात येताच सदर तरुणीस उपचारार्थ दर्यापुरातील उपजिल्हा रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान दुपारी २ वाजताच्या सुमारास मृत तरुणीचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र जोपर्यत तरुणीस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरुध्द गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकार नाही अशी भूमिका भाऊ नितीन गवई व नातेवाईकांनी घेतल्याने उपजिल्हा रुगणालयात रात्री उशिरापर्यंत तणाव सदुश्य परीस्थिती होती.
प्रतिक्रिया :-
डोबांळा येथील युवतीच्या मुत्यूं प्रकरणाची तातडीने चौकशी करणे सुरु आहे. चौकशी नंतरच योग्य निर्णय घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करता येईल.
— विनायक लंबे, ठाणेदार, खल्लार
प्रतिक्रिया:-
प्रेम प्रकरणातुन बहिणीने विष प्राशन केले. गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही खल्लार पोलीसात गेलो असता तिन तास ताटकळत बसवून ठेवले तसेच पोलीसांनी दमदमाटी करीत गुन्हा दाखल न करताच परत पाठवले. गुन्हा दाखल व आरोपीस अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही.
— नितीन गवई, मुतक मुलीचा भाऊ