विनापरवाना खाजगी सुरक्षा एजन्सीचा पर्दाफाश; गुन्हे दाखल

प्रतिनिधी फुलचंद भगत

वाशिम:-मा. पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हयाचा पदभार स्विकारल्यापासुन अनेक उपक्रम हाती घेतले आहे. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीला तसेच बेकायदेशीर कृत्य करणा-या इसमांविरुध्द धडाकेबाज कारवाईचा बडगा दाखविला आहे.वाशिम जिल्हयामध्ये परवाना नसतांना खाजगी सुरक्षा एजन्सी मार्फत सुरक्षा गार्ड पुरविण्यात येत असल्याबाबत माहीती मिळाल्याने सदर बाबतची खात्री केली असता वाशिम शहरातील जिल्हा क्रिडा संकुल,वाशिम येथे गेलो असता तेथे एक इसम पोलीसासारखे दिसणा-या खाकी गणवेशावर स्टार लावुन फिरतांना मिळुन आला त्यास थांबवुन त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव भागवत निवृत्ती मापारी रा.धानोरा मापारी ता.जि. वाशिम आहे. व तो संचालक मोहन काशिबा गोडघासे रा. रिठद ता. रिसोड जि. वाशिम यांचे जवान सिक्युरिटी सहीसेस मध्ये मागील 03 वर्षापासुन जिल्हा क्रिडा संकुल येथे सुरक्षा रक्षक या पदावर काम करीत आहे असे सांगीतले.

त्यास खाजगी सुरक्षा रक्षकाचे प्रशिक्षण घेतले आहे काय याबाबत विचारणा केली असता कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण घेतले नाही असे सांगीतले. दि.10.02.2022 रोजी सदर जवान सिक्युरिटी सहीसचे संचालक मोहन काशिबा गोडघासे यांना चौकशीकरीता बोलवुन त्यांची चौकशी केली असता जवान सिक्युरिटी सहीस या खाजगी सुरक्षा एजन्सीचा परवाना मागीतला ता त्यांनी परवाना नसल्याचे सांगीतले.

तसेच वरील पार्श्वभुमीवर वाशिम शहरात इतर विनापरवाना खाजगी सुरक्षा एजन्सी कार्यरत आहे किंवा कसे याबाबत पोउपनि अनिल पाटील नी चौकशी केली असता 1] रुद्र सिक्युरिटी गार्ड सव्हीसेस, वाशिम संचालक रामेश्वर बबन ठेंगडे रा. गोंदेश्वर, वाशिम 2] के.एस सिक्युरिटी सहीसेस, वाशिम संचालक कपील सुभाष सारडा रा. वाशिम 3] एन.जि. सिक्युरिटी सहीसेस, मंगरुळपीर संचालक नंदुलाल गुलाबराव मनवर रा. मंगरुळपीर यांना सुध्दा खाजगी सुरक्षा एजन्सीचा परवाना (पसारा परवाना) बाबत विचारणा केली असता त्यांनी परवाना नसल्याचे सांगीतल्या वरुन वर नमुद 05 इसमांविरुध्द फिर्यादी स.पो.उपनि गजानन मधुकर पवार यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे वाशिम शहर येथे कलम 171 भादवि सहकलम खाजगी सुरक्षा यंत्रणा अधिनीयम 2005 चे कलम 20, 21 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हयातील नागरीकांना आवाहन केले की, वाशिम
जिल्हयात कुठेही अशा प्रकारे खाजगी सुरक्षा एजन्सी मार्फत विनापरवाना सुरक्षा पुरविली जात असल्यास त्याबाबत नियंत्रण कक्ष, वाशिम 07252-234834 अथवा 100/ 112 या क्रमांकावर माहीती देण्यात यावी. माहीती देणा-याचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल असे पोलिस विभागाने कळवले आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!