१ लाख ९८ हजार चोरणार्‍या चोरट्याला अवघ्या सहा तासाच्या आत कारंजा पोलिसांनी केले जेरबंद

कारंजा तालुक्यातील घटना

प्रतिनिधी फुलचंद भगत

वाशिम:-पो.स्टे.कारंजा ग्रामीण येथे दिनांक ९/२/२०२२ रोजी तकारदार श्री रंगराव विठठलराव नवगिरे रा.परभणी यांनी रिपोर्ट दिला की,मी सोबत पत्नी व डायव्हर असे सकाळी परभणी वरुन चारचाकी वाहनाने खरेदीसाठी अमरावती येथे जात होतो त्यावेळी आम्ही खेर्डा ते अमरावती रोडवर खेर्डा पासून अंदाजे १ कि.मी अंतरावर गाडी थांबवून गाडी रत्यावर लावून जेवणासाठी बाजूचे शेतामध्ये गेलो,त्यापुर्वी माझे पत्नीकडून गाडीचे
मागील दरवाजा लॉक झालेला नव्हता.

आम्ही बाजूचे शेतामधून जेवण करुन गाडीजवळ आलो असता गाडीतील पिशवीमध्ये खरेदीसाठी सोबत ठेवलेले १ लाख ९८ हजार रुपये पिशवीमध्ये दिसले नाही,ते कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्याचे लक्षात आले,वरुन पोलीसांना माहिती दिली अश्या रिपोर्ट वरुन पो.स्टे.ला अप क.६६/२२ कलम ३७९ भा. द.वि.चा गुन्हा दाखल करण्यात येवून तपास सुरु करण्यात आला.

सदरचे तपासामध्ये घटनास्थळी भेट देवून पाहणी करुन आजूबाजूस विचारपूस करण्यात आली,तेव्हा घटना घडली त्यावेळी बाजूच्या शेतामध्ये गुराखी गुरे चारत असल्याबाबत माहिती मिळाली वरुन खेर्डा व आजूबाजूचे गावातील गुरे चारणारे गुराखी यांचा शोध घेण्यात आला व एकूण ८ लोकांना संशयीत म्हणून चौकशी करण्यात आली,त्यापैकी एक गुराखी नामे सुधाकर उकंडा काबंळे वय २५ वर्ष रा.खेर्डा हा
उडवाउडवीची उत्तरे देवू लागला असता अधिक चौकशीवरुन तो त्याठिकाणी गुरे चारण्यासाठी आला होता हे समजले.

त्यास विचारले असता त्याने दिशाभुल करणारी माहिती दिली की,मी तेथे हजर होतो त्यावेळी २ व्यक्ती हेल्मेट घालून मोटरसायकलवर तेथे आले व गाडीचे गेट खोलून बॅग घेवून गेले व माझेच हातातीली काठी घेवून मला धमकावून गेले की कोणाला काही सांगू नको.परंतू त्याचे बोलण्यामध्ये संशय आल्याने व त्याला दबाव टाकून विचारपूस केली असता त्याने गुन्हा स्वत केल्याचे कबुल केले व चोरी केलेली रक्कम १ लाख ९८ हजार त्याचे घरी लपवून ठेवले होते ते काढून दिले. (कारंजा ग्रामीण पोलीसांनी ६ तासाचे आंत आरोपीस जेरबंद केले व रक्कम परत मिळवली याबाबत परभणी जिल्हातील तक्रारदार यांनी वाशिम जिल्हा पोलीसांचे खुप आभार मानले आहे)

सदर गुन्हयाचा तपास मा.पोलीस अधिक्षक श्री.बच्चनसिंग साहेब,अपर पोलीस अधिक्षक श्री.भामरे साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा श्री.पांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन धंदर यांचे नेतृत्वात तपासी अधिकारी स.पोनि योगेश इंगळे,पो.उपनि चंदन वानखेडे, एएसआय धनराज पवार, पोहेका महेंद्रसिंह रजोदिया,पो.सतिश जाधव,उमेश चव्हाण,पोना फिरोज भुरीवाले व इतर हे करीत आहेत.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!