स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे : रासे गावातील काळुबाई जनसेवा मंडळाची यात्रा यावर्षी देखील जोरदार तयारी करून मंडळाने सभासदांना आई मांढरदेवी काळुबाई दर्शन घडून आणले. गेल्या अनेक वर्षांपासून अखंड अविरतपणे रासे गावातील काळुबाई जनसेवा मंडळाने गावातील नागरिकांना देवीचे दर्शन घडुन आणले जात असल्याने मंडळाने तालुक्यात एक आदर्श निर्माण केला आहे.

गावातील काळुबाई जनसेवा मंडळाकडून दरवर्षी सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरदेवी काळुबाईच्या दर्शनासाठी अनेक नागरिक हौसेने जात असतात. या मंडळाकडून दरवर्षी पौष पौर्णिमेला गावातील नागरिकांना आई मांढरदेवी काळुबाईचे दर्शन मोफत घडवले जाते.रासे गावातील कै. पार्वतीबाई किसन शिंदे ह्या काळुबाई देवीच्या परमभक्त होत्या.यांच्या माध्यमातून या देवीला जाण्याचा प्रथम मानस गावातुन करण्यात आला होता. पुर्वी त्यांच्या सोबत गावातील नागरिक पायी मांढरेदेवीच्या दर्शनासाठी डोंगर चढुन जात असत. त्या काळी दळण वळणाची सोय नसल्याने गावातील महिला, पुरुष यांना डोक्यावर साहित्य घेऊन पायी डोंगर चढून पार्वतीबाई काळुबाईच्या दर्शनासाठी घेऊन जात असत.अशी आठवण अजूनही काळुबाई मंडळातील जेष्ठ नागरिक ,महिला अजुनही आवर्जून सांगतात.हीच परंपरा गेल्या 54 वर्षापासुन अखंडपणे चालू असुन रासे गावातील काळुबाई जनसेवा मंडळाकडून अजुनही गावातील नागरिकांना मांढरदेवीच्या दर्शनासाठी घेऊन जात आहेत.

अत्यंत कठीण परिस्थितीवर या मंडळाने मात करून गावातील नागरिकांना दरवर्षी काळुबाईच्या दर्शनासाठी आयोजन केले जात आहे.त्यामुळे अनेक वर्षांपासून जोपासत आलेली ह्या मंडळाची परंपरा नक्कीच तालुक्यातील जनतेपुढे एक आदर्श निर्माण करणारी आहे. ह्या वर्षी देखील मंडळाने काळुबाईच्या दर्शनासाठी गावातील नागरिकांना घेऊन जात देवीचे दर्शन घडवून आणले.कोरोनाचे सावट असले तरी कोरोना नियमाचे पालन करून व आपल्या नागरिकांची काळजी घेऊन मंडळाची यात्रा जोरदार झाली.
