प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-भारताची गानकोकीळा, भारतरत्न लता मंगेशकर यांना कारंजेकर नागरीकांनी एकत्र येत मौन श्रध्दांजली वाहीली. ९ फेब्रुवारी रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद, द्वारकामाई संगीत मैफिल, ईरो फिल्म अॅन्ड म्युझिक, विदर्भ लोककलावंत संघटना, अ. भा. नाट्य परिषद, आझाद हिंद व्यायाम शाळा, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय व कलावंत संजय कडोळे यांच्या सहयोगातून नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळा परिसरात पार पडला.
कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी धिरज मांजरे, ठाणेदार आधारसिंग सोनोने, नायब तहसिलदार विनोद हरणे, माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया, माजी समाजकल्याण सभापती जयकिसन राठोड, माजी नगराध्यक्षा उर्मिलाताई इंगोले, भाजपा शहराध्यक्ष ललित चांडक, पवन रॉय, कश्यप, शिवसेना शहरप्रमुख गणेश बाबरे, काँग्रेस सेवादलचे अॅड. संदेश जिंतुरकर, राजीक शेख, माजी नगरसेवक नितीन गढवाले आदीची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांनी लतादीदींच्या प्रतिमेचे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे पुजन करुन हारार्पण केले. त्यानंतर सर्वानी लतादीदींच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यानंतर दोन मिनीटे सामुहिक मौन पाळून लतादीदींना श्रध्दांजली वाहण्यात आली.
