महाराष्ट्र लवकरच पूर्णपणे अनलॉक वाचा सविस्तर…

मुंबई वार्ता- : राज्यात जानेवारी महिन्यात कोरोनाची तिसरी लाट धडकली होती. पण, आता कोरोनाची लाट ओसरल्याचे चित्र आहे. राज्य सरकारने आधीच जानेवारी महिन्यात लागू केलेले निर्बंध हटवले आहे.पण आता फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्र पूर्णपणे अनलॉक केला जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. कोरोनाची लाट ओसरत चालली आहे.

दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. जानेवारी महिन्यात जितकी संख्या वाढली होती, ती आता कमी झाली आहे. कोरोनाबाधितांची आकडेवारी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. त्यामुळे नाट्यगृह, सिनेमागृह, हॉटेल, बार, रेस्टॉरंट फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण क्षमतेने सुरू करण्याकडे कल राहिलं, अशी माहिती आरोग्यमंत्री राजे8श टोपे यांनी दिली.

राजेश टोपे यांनी चारदिवसांपूर्वीच राज्यात आता पुन्हा निर्बंध लावले जाणार नाही, अशी ग्वाही दिली होती.’सरकार अतिरिक्त निर्बंध लादणार नाही. मात्र येत्या काही दिवसांत ते हळूहळू कमी करेल. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या निर्बंधांवर चर्चा केली. दरम्यान काही ठिकाणी निर्बंध शिथिल केले गेले आहेत आणि प्रकरणांची संख्या कमी झाल्यामुळे हळूहळू राज्यभरात आणखी शिथिल केली जाईल, असं टोपे म्हणाले होते.

Corona तिसरी लाट मार्चपर्यंत संपणार, ICMR चा दावा दरम्यान संसर्गाची तिसरी लाट मार्चपर्यंत संपण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यांनी त्यांच्या सक्रिय (Corona Active case) केसलोडमध्ये घट नोंदवण्यास सुरुवात केली आहे. तर इतरांमध्ये केसेसमध्ये वाढ होत आहे.

भारतातील सक्रिय (COVID-19) संख्या आता 14.35 लाखांवर घसरली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या एका अधिकाऱ्याच्या मते, देशातील काही भागांमध्ये या महिन्याच्या अखेरीस तिसरी लाट ओसरण्याची शक्यता आहे. ICMR चे अतिरिक्त महासंचालक डॉ. समीरन पांडा यांच्या हवाल्याने टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये या महिन्याच्या अखेरीस नवीन रुग्णांची संख्या मूळ पातळीपर्यंत खाली येईल. दरम्यान, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी सांगितलं की, महामारीची तिसरी लाट मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात संपुष्टात येईल.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!