दर्यापूर – महेश बुंदे
तालुक्यातील तोंगलाबाद येथे गुरू श्री लष्करी महाराज यांच्या कृपेने ग्रामदैवत श्री संत हनुमान महाराज पुण्यतिथी महोत्सव दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा संस्थानच्या वतीने ३ फेब्रुवारी पासुन आयोजन करण्यात आले होते.
शासनाच्या कोविड नियमाचे पालन करत सात दिवस श्रीमद भागवत सप्ताह श्री गजानन महाराज शास्त्री कारलेकर यांच्या अमृतवाणीतून संपन्न झाला. यावेळी रोज भागवत, काकडा आरती, हरिपाठ व हरकीर्तन आणि अन्नदान संपन्न झाले. या श्री संत हनुमान महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्ताने दि. १० फेब्रुवारी रोजी होमहवन कार्यक्रम संपन्न होणार असून उद्या दि. ११ फेब्रुवारी शुक्रवार रोजी या महोत्सवाची सांगता होणार असून सकाळी काल्याचे किर्तनानंतर श्री’ ची पालखी मिरवणूक, दहीहंडी व महाप्रसाद आयोजित केला आहे.
