Post Views: 374
कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेचा उपक्रम
प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-जल जीवन मिशनअंतर्गत ग्राम स्तरीय समिती सदस्यांच्या सोयीसाठी कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण या संस्थेने जलशक्ती मंत्रालयाचे संचालक पी. विश्वकन्नन यांच्या हस्ते जल साक्षर या ॲपचे (प्रक्षेपन) लाँचिंग करण्यात आले.वाशिम येथे जल जीवन मिशनच्या प्रशिक्षणादरम्यान ऑन लाईन कार्यक्रमात या ॲप प्रक्षेपन (2 फेब्रुवारी) करण्यात आले.
ऑनलाईन झालेल्या या कार्यक्रमास मुंबई येथील राज्य पाणी व स्वच्छता मिशनचे मनुष्यबळ विकास तज्ञ विजय गवळी, विभागीय सल्लागार अरुण रसाळ, वाशिमचे मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर आंबेकर कृषी विकास व ग्रामीण्ण प्रशिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित नाफडे यांची उपस्थिती होती.केंद्र सरकार पुरस्कृत जल जीवन मिशन योजनेअंतर्गत, VWSC – ग्राम पाणी व स्वच्छता समिती च्या सदस्यांची क्षमता बंधानीचे काम जोमाने सुरु आहे. पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, पाणी पुरवठा सुनिश्चित करणे आणि गाव कृती आराखडा तयार करणे या विषयांवर जनजागृती, प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिके आयोजित करण्यासाठी विविध संस्थांना प्रतिबद्ध करण्यात आले आहे.
मिशनचे उद्दिष्ट प्रति व्यक्ती प्रतिदिन ५५ लिटर पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे हे आहे. प्रत्येक गावामध्ये जलस्रोतांना बळकट करण्यासाठी व प्रत्येक घराला नळाच्या पाण्याची जोडणी देण्यासाठी व आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ग्रामस्थरीय कृती आराखडा तयार करण्यात येत आहेत.
कृषी विकास व ग्रामीण शिक्षण संस्थेला महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील नेमलेल्या विशिष्ठ जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी प्रमुख संसाधन संस्था (KRC) म्हणून निवडण्यात आले आहे. महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात 31 जानेवारी 2022 रोजी या क्रमातील पहिले प्रशिक्षण सुरू झाले. कार्यक्रमात प्रात्यक्षिके, प्रदर्शने, क्षेत्र भेटी, फिल्ड एक्टिविटी, टेक्निकल सत्रे, कृतीतून शिक्षण असे अनेक उपक्रम घेण्यात आले. प्रशिक्षणार्थीच्या विरंगुळ्यासाठी रात्री मनोरंजक कार्यक्रम सुध्दा घेण्यात आले.
15 ग्रामपंचायतीतील 75 VWSC – ग्राम पाणी व स्वच्छता समिती च्या सदस्यांनी प्रशिक्षणात सहभाग नोंदवला. 02 फेब्रुवारी 2022 रोजी माननीय जलशक्ती मंत्रालयाचे संचालक पी. विश्वकन्नन यांच्या उपस्थितीत चार दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था द्वारे जल साक्षर या ॲपच्या प्रक्षेपनासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन कार्यक्रमात सहभागींनी संचालकांशी संवाद साधला आणि 4 दिवसांच्या प्रशिक्षणाविषयी आपले अनुभव कथन केले.
या प्रसंगी, कृषी विकास व ग्रामीण शिक्षण संस्थेने ग्राम पाणी व स्वच्छता समिती सदस्यांच्या क्षमता वाढीसाठी JAL SAKSHAR (जल साक्षर) नावाचे मोबाईल ऍप् लॉन्च केले. या ऍप् च्या माध्यमातून सामान्य लोक जल जीवन मिशन योजने बद्दल आवश्यक माहिती, व उपयुक्त तांत्रिक विडीओ पाहण्यासाठी मिळु शकतात. तसेच ग्राम पाणी व स्वच्छता समितीचे सदस्य हे त्यांच्या जिल्हा कक्षामध्ये सहभागी होऊन विशेष प्रशिक्षन सामग्री आणि वेबिनार्स चा लाभ घेऊ शकतात.