आमला विश्वेश्वर या गावी जाऊन जिल्हा परिषद च्या कामाची पाहणी
विकास कामांची पद्धती, कामांची गुणवत्ता, जनतेच्या सेवेकरीता त्यांच्या दळणवळणा करीता होत असलेल्या रस्त्याची आमदार प्रताप अडसड जेव्हा पाहणी करतात तेव्हा कंञाटदार, संबंधित अधिकारी इंजिनियर यांचे धाबे दणाणतात.
पहा व्हिडिओ
आम्हांला आमचा हिस्सा मिळाला म्हणून अधिकारी शांततेची भूमिका घेत असेल आणि कंञाटदार मदमस्त पद्धतीने जनतेच्या हक्काच्या पैश्यावर बेकायदेशीर पद्धतीने रस्त्यांची कामे करत असेल तर ही पद्धती मतदारसंघात खपवून घेतल्या जाणार नाही.
पहा व्हिडिओ
जनतेच्या पैश्यावर मौज करू बघणाऱ्या अधिकारी व कंञाटदाराना मुभा नाही. पाथरगाव ते आमला विश्वेश्वर जिल्हा परिषदचे काम निकृष्ट दर्जाचे.
काम सुरू असतांना आमदार प्रतापदादा अडसड यांनी अभियंत्याना मोजणी करायला लावली असता निर्धारित मानकानुसार काम नसल्याचे निदर्शनास आले आहे.
मतदारसंघात सत्तेचा दुरूपयोग करून अधिकाऱ्यांवर दबाव तंञाचा वापर करून जनतेच्या हक्काच्या निधीतून यापद्धतीने हातमिळवणी करून कोणी स्वतःचे घर भरत असतील तर हे खपवून घेतल्या जाणार नाही.