मालेगाव तालुक्यात गुटखा जप्त,पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी फुलचंद भगत

वाशिम:-दि.08.02.2022 रोजी पो.नि.किरण वानखडे , पो.स्टे.मालेगांव यांना गोपनिय माहिती प्राप्त झाली होती की,रिधोरा फाटा एक इसम त्याचे ताब्यातील मोटार सायकलवर थैल्या लटवुन महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा
मालाची विक्री करीत आहे.

करिता प्राप्त झालेल्या गोपनिय माहिती वरुन पो.नि.किरण वानखडे यांनी पो.स्टॉफ यांना सोबत घेवुन रिधोरा फाटा येथे जावुन मोटार सायकलवर संशईतरित्या दिसुन आलेल्या इसमास चेक केले असता त्याचे ताब्यात वाह , नजर , पान बहार , विमल पान मसाला , विमल V-1 या प्रमाणे एकुण 49250/-रु.चा गुटखा माल मिळुन आल्याने त्यास त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव सुनिल विश्वनाथ सानप रा.ब्राम्हणवाडा असे सांगीतले.

त्यानंतर पकडण्यात आलेल्या इसम ब्राम्हणवाडा येथील रहिवाशी असल्याने त्याचे ब्राम्हणवाडा येथील घराची झडती घेतली असता त्याचे घरा मध्ये सुध्दा वाह , नजर , पान बहार , विमल पान मसाला , विमल V.1 या प्रमाणे एकुण 51000/-रु.चा गुटखा माल मिळुन आला असा एकुण 100250/-रु.चा गुटखा माल व मोटार सायकल व एक मोबाईल असा एकुण 1,60,250/-रु.चा मुद्देमाल आरोपीचे ताब्यातुन जप्त करण्यात आला आहे.

तसेच आरोपी सुनिल विश्वनाथ सानप याचेकडे सदरचा गुटखा माल कोठुन आणला याबाबत अधिक तपास केला असता सदरचा माल हा मालेगांव येथील बंडु नंदलाल यादव याचेकडुन घेतल्याचे सांगीतल्याने सदर प्रकरणामध्ये 1.सुनिल विश्वनाथ सानप रा.ब्राम्हणवाडा व 2.बंडु नंदलाल यादव रा.मालेगांव यांचे विरुध्द पो.स्टे.मालेगांव येथे अप.क्र.51/22 क.188, 272, 273, 328 भादंवि नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.उपनि.सारीका नारखेडे.पो.स्टे.मालेगांव हया करीत आहेत.

सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक साहेब श्री.बच्चन सिंह , अपर पोलीस अधिक्षक श्री.गोरख भामरे,ऊपविभागीय पोलीस अधिकारी श्री.सुनिलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार श्री.किरण वानखडे सपोनि.तानाजी गव्हाणे , प्रोपोउपनि.सारीका नारखेडे , पोहेकॉ.गजानन झगरे , पोहेकॉ.प्रशांत वाढणकर , नापोकॉ.सुधीर सोळंके , नापोकॉ.विजय डोईफोडे व मालेगांव पोलीस स्टॉफ ने केली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!