स्वरसम्राज्ञी,गाणकोकीळा लतादीदी काळाच्या पडद्याआड, देशाचा सुमधुर आवाज हरपला

देशातील महान गायिका, गाणसरस्वती, भारतरत्न लता मंगेशकर यांचे ९३ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. आपल्या स्वर्गीय सुरांनी अनेक गीतांना अजरामर करणाऱ्या लतादिदींचा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात सकाळी 8 वाजून 12 मिनीटांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी देशभर पसरताच संपूर्ण देशभरात शोकाची लाट पसरली आहे. तसेच, लतादिदींच्या जाण्याने संगीतविश्व, कलाविश्व पोरके झाल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून आणि दिग्गजांकडून देण्यात आली आहे तब्बल महिन्याभरापासून मुंबई येथील बीचकैंडी रुग्णालयात सुरु होते उपचार…

दिनांक ८ जानेवारी रोजी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून लतादीदींवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. दरम्यान काही दिवसांनंतर त्या कोरोनातून बऱ्या झाल्या होत्या. तसेच, त्यांची तब्येतही सुधारल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली होती. परंतू, कोरोनासह त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाली होती, ज्यावर उपचार सुरु होते. अन् त्यामुळेच त्यांची तब्येत पुन्हा बिघडली.

दिदींची तब्येत अचानक खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना शुक्रवारी (५ फेब्रुवारी) आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ‘लतादिदींची प्रकृती गंभीर असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत’, अशी माहिती ब्रीच कँडी रुग्णालयाच्या प्रमुख डॉक्टरांनी दिली होती. मात्र, अखेरीस उपचारादरम्यान ९३ वर्षीय भारतरत्न लता मंगेशकर यांची प्राणज्योत मालवली.


लता मंगेशकर यांचा जीवनप्रवास…

मास्टर दिनानाथ मंगेशकर आणि शेवंती मंगेशकर या दांपत्याच्या घरात इंदौर येथे दिनांक २८ सप्टेंबर १९२९ रोजी लता मंगेशकर यांचा जन्म झाला. अगदी लहान वयापासूनच लतादिदींनी गायकीला सुरुवात केली. पुढे अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमातून आणि नंतर बॉलिवूड, मराठी या सिनेक्षेत्रासह अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या गोड आवाजाने कोट्यवधी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.शेकडो हिंदी चित्रपट आणि सुमारे 36 देश विदेशी भाषांमध्ये आपला स्वरसाज उमटवला.तब्बल पस्तीस हजारहून अधिक गाणी गायली आहेत.

अनेक दशके त्यांनी आपल्या मधूर आवाजाने रसिकांची मने जिंकली नव्हे तर त्यांच्या मनावर राज्य केले. लता मंगेशकर यांनी त्यांच्या जीवनात हजारो गाणी गायली, ज्यातील काही गाणी लतादिदींप्रमाणेच अजरामर आहेत. लतादिदींनी अगदी लहानपणापासूनच संगीत हेच आपले आयुष्य बनवले. संगीत, जे कधी आपल्याला हसवते तर कधी आपल्या डोळ्यातून अश्रु आणते. अशा दोन्ही आवाजांची देणगी लता मंगेशकर यांना लाभली होती.

संगीतविश्वातील एक युग काळाच्या पडद्याआड गेल्या असल्या तरी आपल्या गाण्यातून कायम सर्वांच्या मनावर राज्य करतील. आज संध्याकाळी शिवाजी पार्कवर शासकीय इतमात अंत्यसंस्कार होणार आहेत.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!