रवी मारोटकर ब्युरो चीफ
अमरावती वार्ता :- नांदगाव खंडेश्वर येथील जावरा रोड वरील मातामाय मंदिरानजीक भूषण नंदकिशोर हुमणे वय 21 वर्षे राहणार धोत्रा देशमुख तालुका कारंजा लाड जिल्हा वाशिम या युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्येच्या कारणाचा पोलीस तपास करीत आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार भूषण हुमणे हा युवक हॉटेल कामगार म्हणून अनेक ठिकाणी कामासाठी जात होता. त्याचा लहान भाऊ हा नांदगाव खंडेश्वर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहे. त्याच्याकडून याबाबत पोलिसांना माहिती मिळाली.
