वंचित बहुजन आघाडी अमरावती जिल्हा(पूर्व)ची आढावा सभा वंचित बहुजन आघाडी कार्यालय,चांदूर रेल्वे येथे घेण्यात आली.या सभेत अमरावती जिह्यातील जिल्हा परिषद व महानगर पालीका व नगरपालीका निवडणुकीच्या संदर्भात आढावा घेण्यात आला.
या आढावा सभेच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन युवा आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा,प्रमुख अतिथी म्हणून अमरावती(पूर्व) जिल्हाध्यक्ष अशोक मोहोड,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विद्या वानखडे,जिल्हा उपाध्यक्ष बाबाराव गायकवाड,जिल्हा महासचिव प्रा.रवींद्र मेंढे,अमरावती महानगर महासचिव प्रमोद राऊत,जिल्हा सचिव नंदकुमार खंडारे,जिल्हा कार्यकारिणी सदस्य अनंत खडसे,वसंत मेंढे उपस्थित होते.
यावेळी प्रास्तविक भाषणातून प्रा.रवींद्र मेंढे यांनी पुणे येथे झालेल्या पक्षाच्या दोन दिवशीय कार्यशाळेतील पक्ष बांधणी संदर्भात महत्वाची माहिती सांगीतली.तर प्रमोद राऊत यांनी महानगर पालीका निवडणुकीत पक्ष रणनिती कशी राहणार यांची माहिती दिली.जिल्हाध्यक्ष अशोक मोहोड यांनी जि.प.निवडणूकीपुर्वी सर्व तालुका कार्यकारिणीने त्यांच्या तालुक्यातील सर्व गाव शाखा व बुथ शाखा कशा प्रकारे बांधायचे हे सांगुन त्वरीत कामाला लागण्याचे आदेश दिले.महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी पक्षाचे संस्थापक अॅड.बाळासाहेब आंबेडकर बायपास सर्जरी झाल्यानंतर विश्रांती न घेता ते संपूर्ण महाराष्ट्र पिंजुन काढत आहे.त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकत्र्यांनी आपली महत्वाची सर्व कामे बाजुला सारून जीवाचे रान करीत येत्या जिल्हा परिषद,महानगर पालीका व नगरपालीका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवा असे आवाहन केले.यावेळी निलेश विश्वकर्मा यांच्या हस्ते अमरावती तालुक्याचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष राहुल भालेराव यांचा सत्कार करण्यात आला.
या सभेला अमरावती तालुकाध्यक्ष राहुल भालेराव,नांदगाव खंडेश्वर तालुकाध्यक्ष लालचंद इंगोले,महासचिव संघदीप घुगरे,चांदूर रेल्वे महिला आघाडीच्या तालुका सचिव अनिता धवने,चांदूर रेल्वे शहराध्यक्षा उषा मेश्राम,शहर महासचिव सविता पुâलझेले,रोशन बनसोड,प्रेमचंद अंबादे,गजानन मोहोड,राहुल मोहोड,अजय राऊत,अश्विन पाटील,दीपक वानखडे,जयकिरण इंगोले,सतिश शेंडे,अनिल वुंâभलवार,अक्षय गणविर,उत्तम इंगोले,मंगेश शिरभाते,अतुल खंडाते,सुरेंद्र पुâसाटे,सिध्दार्थ बेंडे,जयपाल चहांदे,अनिल भोडे,जगजीवन गाडगे यांच्यासह चांदूर रेल्वे,धामणगाव व नांदगाव खंडेश्वर येथील वंचित बहुजन आघाडी,महिला आघाडी व युवा आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.