प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम : जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज कारंजा येथील प्रसिद्ध श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदीर अर्थात गुरु मंदीराला भेट देऊन गुरु माऊलींचे दर्शन घेतले. यावेळी नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थानतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

विश्वस्त मंडळातर्फे आशा सोनटक्के, सुरेखा घुडे, स्मिता बरडे, मिनाक्षी खेडकर व श्रद्धा घुडे यांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. वेद पाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी शांतीपाठ केला.

श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नारायणराव खेडकर, वसंत स्वस्तकर, विनायक सोनटक्के, दिगंबर बरडे, कृष्णराव नांदेडकर, प्रकाश घुडे, अविनाश खेडकर, अतुल बरडे व निलेश घुडे यांची यावेळी उपस्थिती होती. गुरुमाऊलींच्या दर्शनाने आपण धन्य झालो अशी प्रतिक्रीया व्यक्त करतांनाच गुरुमाऊली सर्व जगाचे कल्याण करो, अशी प्रार्थनाही यावेळी राज्यपालांनी केली.

आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलीस अधिक्षक गोरख भामरे, उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, तहसीलदार धीरज मांजरे व नगर परिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांची यावेळी उपस्थिती होती.

