प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-मंगरूळपीर येथील श्री संत बिरबलनाथ महाराज यांचा ९३ वा यात्रा महोत्सव कोरोना विषाणु संसर्गाच्या नियमावलीनुसार साध्या
पध्दतीने साजरा करण्यांचा निर्णय संस्थान व्यवस्थापनाकडून घेण्यांत आला असुन हा धार्मीक सोहळा कोरोना संसर्ग प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शासनाने घालून दिलेल्या अटी,शर्ती व नियमाचे पालन करून दिनांक १९/०२/२०२२ शनिवार
रोजी स.१०-०० वाजता ‘श्री’ ची महापुजा तर दि.
२१/०२/२०२२ सोमवार रोजी दर्शनाकरीता आलेल्या भाविकांना सोशल डिस्टसिंगचा वापर करून दर्शन रांगेतच प्रसाद देण्यात येणार आहे.
दि. २२/०२/२०२२ मंगळवार स. १०-०० वा. “श्री’ च्या पालखीची मिरवणुक मंदीराच्या आंतमध्येच प्रदक्षिणा पुर्ण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात येईल.

महाप्रसाद व गावामधील ‘श्री’ च्या पालखीची मिरवणूक रद्द करण्यांत आली आहे.मंदीरात दर्शनाकरीता येणाऱ्या भाविकांकरीता संस्थानकडून सॅनिटायझरची व्यवस्था करण्यांत
आली आहे. तर भाविकांनी तोंडाला मास्क व गर्दी न करता सोशल डिस्टसींगचे वापर करण्यांबाबत
विनंती करण्यांत आली आहे. मंदीरात होणारी गर्दी टाळण्याकरीता भाविकांनी दर्शन आटोपल्यानंतर
लवकरच मंदीरातून निघून जावे अशी विनंती सुध्दा संस्थान कडून करण्यात येत आहे. कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मागील वर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा यात्रा उत्सव अगदी साध्या पध्दतीने व शासनाने घालून दिलेल्या कोरोना विषयक नियम, अटी व शर्तीचे काटेकोर पालन करून साजरा करण्यांचे संस्थान व्यवस्थापनाने कळविले आहे.
