Post Views: 405
वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अमरावती:-सुभाष कोटेचा
सावंगी मग्रापूर येथील वार्ड क्र.१ दलित वस्तीतील रहिवाशांचा पाणी प्रश्न त्वरीत निकाली काढत अनेक वर्षापासून अनुसूचित जातीच्या लोकांना पाण्यासारख्या मुलभूत अधिकारापासुन वंचित ठेवणारे सरपंच,उपसरपंच व संबधीत प्रशासकिय अधिकाऱ्यांवर अॅट्रोसिटी अॅक्ट अन्वये गुन्हे दाखल करून कार्यवाही करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी अमरावती च्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली.
चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर येथील वार्ड क्र.१ दलित वस्तीतील रहिवाश्यांचा मागील २५ वर्षापासुन पेयजलाचा भीषण प्रश्न आहे.या संदर्भात त्यांनी वारंवार सावंगी मग्रापूर ग्रा.पं.कडे निवेदन दिले.तसेच चांदूर रेल्वे उपविभागीय अधिकारी,तहसिलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन दिलीत; मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.या संदर्भात वंचित बहुजन आघाडीने चांदूर रेल्वे बिडीओ यांना १४/०१/२०२२ रोजी लेखी निवेदन देऊन त्वरीत कार्यवाही करण्याची मागणी केली होती.त्यावर कार्यवाही झालेली नाही.
सावंगी संग्रामपूर येथील दलित वस्तीत नळ आहेत मात्र पाणीच येत नाही.फेब्रुवारी २०२१ च्या ग्रा.पं.निवडणुकीनंतर या वार्डातील मुबलक पाणी येणारे ४ सार्वजनिक नळ ग्रा.पं.ने ठराव घेऊन काढुन टाकले आहे या वस्तीतील नागरिक पाण्यासाठी अन्य नागरिकांकडे गेले असता त्यांचे नळ कनेक्शन सत्ताधारी बंद करू टाकू अशी धमकी देतात.त्यामुळे कोणीही त्यांना पाणी देत नाही.त्यामुळे येथील नागरिकांना गुंडभर पाण्यासाठी बारा महिणे गावाबाहेरील २ कि.मी.अंतरावरील विहिरीचा आसरा घ्यावा लागतो. एक महिण्यापूर्वी पाणी मिळावे म्हणून या वस्तीतील सार्वजनिक नळाच्या खाली खड्डा केला म्हणून या वार्डातील घरगुती नळांचा पाणीपुरवठा सरपंच व उपसरपंच यांनी हेतुपुरस्पर बंद केला आहे. एका विशिष्ट समाजाची वस्ती असल्याने सत्ताधारी त्यांच्यावर सतत अन्याय-अत्याचार करीत आहेत. पाणी हा मानवाची मुलभुत गरज असतांना त्यांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम गा.पं.च्या सत्त्ताधाऱ्यांनी सतत केले आहे.ही बाब अत्यंत निंदनीय आहे.सततच्या अत्याचाराने बौध्द बांधव त्रस्त झाले आहे. त्यामुळे सावंगी मग्रापूर येथील
बौध्द बांधवांसह अन्य गावकऱ्यांसह २ फेब्रुवारीच्या रात्री गावाबाहेरच्या पाठवठ्यावर तळ ठोकला आहे.
या प्रकरणी आपण त्वरीत लक्ष घालुन त्वरीत कार्यवाही करून त्यांना न्याय द्यावा आणि अनेक वर्षापासून अनुसूचित जातीच्या लोकांना पाण्यासारख्या मुलभूत अधिकारापासुन वंचित ठेवल्यामुळे सरपंच,उपसरपंच व संबधीत प्रशासकिय अधिकाऱ्यांवर अॅट्रोसिटी अॅक्ट अन्वये गुन्हे दाखल करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी ची आहे. या संदर्भात त्वरीत कार्यवाही न केल्यास वंचित बहुजन आघाडी, संपूर्ण महाराष्ट्रभर तिव्र आंदोलन छेडेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला.
निवेदन देतांना अमरावती जिल्हाध्यक्ष प्रा.शैलेश गवई, जिल्हाध्यक्ष अशोक मोहोड,महिला आघाडी अध्यक्षा विद्या वानखडे ,जिल्हा महासचिव प्रा.रविंंद्र मेंढे,अमरावती महानगर महासचिव प्रमोद राऊत,जिल्हा उपाध्यक्ष बाबाराव गायकवाड,सागर भवते,शाम कुणबीथोप,श्रीधर खडसे,बेबीनंदा लांडगे,हिरू मेंंढे,अनिता धवने,दीपक बांबोडे,धीरज मेश्राम,रोहीत गवई,पंकज कांबळे,विजय रामटेके,प्रफुल्ल वाकोडे,हिंमत वानखेडे,अनिल मोहोड,शुभम हेंडवे,गणेश ढोके,अशोक कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.