Post Views: 1,233
चाकण पोलीसांकडुन एकाला अटक त्याचेकडुन एक गावठी पिस्टलसह दोन जिवंत काडतुस हस्तगत
प्रतिनिधी कुणाल शिंदे
दिनांक ०१/०२/२०२२ रोजी चाकण पोलीसांना गोपनीय बातमीदारांकडुन माहिती मिळली की, चाकण पोलीस स्टेशन हद्दीत चाकण ते रोहकल रोडवरील डायमंड हॉटेल जवळ रोडवर एक इसम गावठी बनावटीचे पिस्टल विक्रीचे उद्देशाने येणार आहे. सदर माहितीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी चाकण पोलीस स्टेशन कडील डि.बी. पथकाला छापा टाकुन कारवाई करणे बाबत सुचना व मार्गदर्शन केले,
डी बी पथकाने सदर बातमीचे ठिकाणी सापळा लावला असता एक इसम संशयीत रित्या कावरा बावरा होवुन इकडे तिकडे बघत उभा असलेला दिसला. त्यावेळी त्याचेवर छापा टाकुन त्यास पकडे असता त्याने त्याचे नाव किशोर दत्तात्रय पाटे वय २३ वर्षे, एकता नगर, चाकण ता. खेड जि. पुणे असे सांगीतले. त्याची झडती घेतली असता त्याचे कमरेला डाव्या बाजुला एक गावठी बनावटीचे पिस्टल व पॅन्टचे खिशामध्ये दोन जिवंत काडतुस अशी एकुण २५,४००/- रू. किंमतीचे अवैध हत्यार मिळून आले.
सदर प्रकरणी पोलीस नाईक / हनुमंत काबळे यांचे फिर्यादी वरून चाकण पोलीस स्टेशननी आर्म ऍक्ट कलम ३, ७, २५ सह मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (३) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी किशोर पाटे याचे विरोधात यापूर्वी भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे २७५/२०१८ भादवि कलम ३६३,३६५,३२७, ३७९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल असुन तो सराईत गुन्हेगार आहे. वरील आरोपी यास अटक करण्यात आलेली असुन त्याची दिनांक ०३/०२/२०२२ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश साहेब, अपर पोलीस आयुक्त श्री. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- १ श्री. मंचक इप्पर, सहा. पोलीस आयुक्त, प्रेरणा कट्टे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलीस निरीक्षक अनिल देवडे, सहायक पोलीस निरीक्षक, विक्रम गायकवाड, स फ़ौ सुरेश हिंगे, बुरूड, पो.हवा ऋषीकुमार झनकर, संदिप सोनवणे, हनुमंत कांबळे, पो.ना भैरोबा यादव, निखील शेटे, पो.को निखील वर्पे, प्रदिप राळे, अशोक दिवटे यांनी केलेली आहे.