दर्यापूरातील कन्येचा अमेरिकेतील युवकाशी विवाह संपन्न

दर्यापूर – महेश बुंदे

दर्यापूर येथील श्रद्धा मस्के या सामान्य कुटुंबातील परंतु उच्य शिक्षित व धडपडणारी मुले या साने गुरुजींच्या दृष्टीतुन वावरणाऱ्या मुलां-मुलींमध्ये तंतोतंत बसणारी श्रध्दा मस्के ह्या तरुणीने सुरुवातीपासूनच आपल्या गरीब परिस्थितीला झुंज देत विविध क्षेत्रात चुणूक दाखविण्याचा प्रयत्न करीत असताना आयुष्याची स्वप्ने रंगविताना अमेरिका येथील अँड्रिव रॉबिनसन ह्यांच्या सेल्फ फोनच्या माध्यमातून संपर्कात आली आणि दीड वर्ष त्या युवकाशी संपर्क साधत त्यांनी एकमेकांची मने जिंकली आणि दिनांक २ फेब्रुवारीला अमरावती येथील सिलेब्रेशन हॉलमध्ये हे नवदाम्पत्य विवाह बंधनात अडकले.

पहा व्हिडिओ

अमेरिकन तरुण अँड्रिव रॉबिनसन हा तेथील पोलीस विभागात सायबर क्राईम या विभागात कार्यरत आहे तर त्याचे वडील निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. अँड्रिव यांची आई तेथील शाळेत शिक्षिका आहे असे उच्य शिक्षित असलेल्या कुटूंबात दर्यापूरातील एक सामान्य कुटूंबातील मुलगी जेव्हा नववधू म्हणून प्रवेश करते तेव्हा ही बाब दर्यापूरकरांसाठी आश्चयचा विषय ठरते. अशा या आगळ्या-वेगळ्या विवाहाची चर्चा दर्यापूर नगरीमध्ये सध्या सगळीकडे होत आहे.

पहा व्हिडिओ

यावेळी प्रेस क्लबचे सचिव तथा पावर ऑफ मीडियाचे उपाध्यक्ष गजानन देशमुख, प्रा. डॉ. गजानन हेरोळे, युवा स्वराज्य वार्ताचे पत्रकार महेश बुंदे या सर्वांनी या नवदाम्पत्याचे कौतुक व अभिनंदन केले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!