Post Views: 475
(विविध संघटनांनी केले शेंडे यांचे स्वागत)
दर्यापूर – महेश बुंदे
अमरावती जिल्ह्यातील श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित रत्नाबाई हायस्कूल दर्यापूरच्या मुख्याध्यापक पदी हरीश उर्फ हेमंत किसनराव शेंडे मुख्याध्यापकपदी रुजू झाले, त्याबद्दल प्रेस क्लबचे सचिव तथा पावर ऑफ मीडियाचे उपाध्यक्ष गजानन देशमुख, युवा पत्रकार महेश बुंदे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ शाखा दर्यापूरचे अध्यक्ष संतोष मिसाळ यांनी शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला.
त्यावेळी ज्येष्ठ शिक्षक हेमंत रेचे, शिक्षक प्रतिनिधी विलास मुळे, संजय पचारे, राहुल महाजन, विनोद मेश्राम, श्रीकृष्ण करडे, प्रमोद घुरडे, निलेश काळे, क्रीडा शिक्षक गजेंद्र हागोने, संगीत शिक्षक नितीन प्रधान, सुधीर पिसे, विलास सोळंके, सौ. ज्योती बांबल, कला शिक्षिका सौ. मीनल कावडकर, सौ. अश्विनी बुरघाटे, सौ. ज्युली जामठे, कू. सारिका उपासे, शिक्षकेतर कर्मचारी अविनाश धर्माळे, संजय इंगळे, प्रशांत होले, महावीर सावळे, गजानन गावंडे हे उपस्थित होते.