दर्यापूर – महेश बुंदे
महसूल वाढविण्यासाठी शासनाने सुपरमार्केट व किराणा दुकानांमध्ये वाईन उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे महसूल वाढविण्याच्या नादात तरुण पिढीमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढणारच हा निर्णय असल्याचा संताप प्रक्रिया आता दर्यापूर शहरात उमटत आहेत. किराणा दुकानावर किशोरवयीन मुले-मुली महिलांना विविध खरेदीसाठी जावे लागते. त्याठिकाणी वाईन उपलब्ध असल्याने किशोरवयीन तरुण मुलेही नकळतपणे त्याकडे आकर्षित होऊ शकतात हा निर्णय शासनाने त्वरित मागे घ्यावा अशी मागणी दर्यापूर तालुक्यात होत आहे.

प्रतिक्रिया –
“किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीमुळे मोठ्या प्रमाणात व्यसनाधीनतेचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये गावागावांमध्ये वाढेल, एकीकडे दारूबंदीसाठी मोठ्या प्रमाणात लढा सुरू असताना हा निर्णय अत्यंत दुर्दैवी म्हणावा लागेल.”
- माणिक मानकर
(तालुका अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, दर्यापूर)
” किराणा दुकानांमध्ये वाईन मिळाल्यानंतर मुले आहारी जाऊन उद्या दारूचे व्यसन करायला मागे पुढे पाहणार नाहीत. शासनाने घेतलेला हा निर्णय दुर्दैवी आहे. तो त्वरित मागे घ्यायला हवा, महसूल वाढविण्याची शासनाला इतरही उपाययोजना करता येतील, तसेच शेतकऱ्यांना भाव वाढवून द्यावा. या निर्णयावर शासनाने पुनर्विचार करावा.”
- नाना माहोरे
(शहराध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, दर्यापूर)