नवजीवन हॉस्पिटल मध्ये नातेवाईकांचा गोंधळ,(आरोपीवर कारवाई करण्याची डॉक्टर असोसिएशनची मागणी)

दर्यापूर – महेश बुंदे

दर्यापूर येथील नवजीवन हॉस्पिटल मध्ये रुग्णांच्या नातेवाइकांनी शुल्लक कारणावरून गोंधळ व आवाज चढविला, रुग्णाच्या बोटाला खरचटले असून थोड्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु होता, त्याच्या प्रथमोपचारासाठी डॉक्टर रवींद्र साबळे यांच्याकडे धाव घेतली, डॉ. रवींद्र साबळे हे प्रसूती कक्षामध्ये व्यस्त होते त्यामुळे सदर रुग्णांला सेवा देण्यासाठी विलंब झाला असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांकडून प्रसूती कक्षाचा दरवाजा पायाने वाजवत मोठ- मोठ्याने आवाज चढविला त्यामुळे दवाखान्या मधील इतर भरती असलेले रुग्ण यांच्यामध्ये सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

प्रसूती कक्षामध्ये महिलेची प्रसूती होत असतांना डॉक्टरांच्या कामात व्यत्यय निर्माण झाला होता, प्रसुती कक्षातून बाहेर येताच रुग्णांच्या नातेवाईकांनी सुद्धा डॉ. रवींद्र साबळे यांच्यावर हल्ला चढविला त्याचवेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले असता पोलिसांनाही सुनिल पवार नामक व्यक्तीने धक्काबुक्की केली अशा भयावह परिस्थितीमध्ये आरोपीला पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले, पुढील तपास दर्यापूर पोलीस स्टेशन करीत आहे, आरोपीवर गुन्हा नोंदविण्यासाठी शहरातील डॉक्टरांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत आरोपीवर गुन्हा नोंदविण्यासाठीचे निवेदन यावेळी देण्यात आले, यापुढे शहरातील डॉक्टरांवर हात उगारला गेला तर डॉक्टर असोसिएशन गप्प बसणार नाही असे यावेळी संतप्त झालेल्या डॉक्टरांनी प्रतिक्रिया व्यक्त केली, निवेदन देतेवेळी डॉ. अविनाश ठाकरे, डॉ. रवींद्र साबळे, डॉ. आय.एस. पठाण, डॉ. अभिजीत टाले, डॉ. जीवन डालके, डॉ. सचिन नागे व इतर डॉक्टर सर्व एकत्र आले होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!