बातमी संकलन – महेश बुंदे
एकविसाव्या शतकात कर्मयोगाची ध्वजा संपुर्ण महाराष्ट्रभर फडकवणारे, वैराग्यमुर्ती श्री संत गाडगेबाबांनी आपल्या हयातीत सन १९०५ ला श्री क्षेत्र ऋणमोचन येथे “सेवा परमो धर्म” याप्रमाणे अंध, अंपग, निराश्रीतांकरीता अन्नदान व वस्त्रदानाचा सुरु केलेला महायज्ञ गेल्या ११७ वर्षापासुन अखंडीतपणे सुरु आहे.
यावर्षी देखील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करत संस्थेचे प्रमुख विश्वस्थ बापुसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनात, खऱ्या अर्थाने मानवतेची सेवा म्हणुन बाबांची कर्मभूमी असलेल्या डेबुजी उर्फ श्री संत गाडगे महाराज लक्ष्मीनारायण संस्था ऋणमोचन येथे दर्यापुर अंजनगाव सुर्जी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बळवंत वानखडे यांच्या समवेत उपस्थीत दानशुर मंडळीच्या शुभहस्ते दृष्टीहिन, दिव्यांग व गरजू मायबापांना सुंदर उबदार स्वरुपाचे ब्लॅंकेट, महिलांना साड्या, पुरुषांना स्वेटरचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी सुंदर मिष्ठान्नाचे भोजन देण्यात आले. यामध्ये बुंदी, शिरा, बर्फी, शेव देत खऱ्या अर्थाने दिनदुबळ्यांची दिवाळी साजरी करण्यात आली.

दरम्यान श्रीक्षेत्र ऋणमोचन येथिल विकास कामाकरीता राज्यमंत्री बच्चु कडू व आमदार बळवंत वानखडे यांचे संस्थेतर्फे बापुसाहेब देशमुख यांनी आभार मानले. प्रामुख्याने या सोहळ्याकरीता अकोला येथिल श्री संत गाडगे महाराज सेवा समिती संस्थेतर्फे राजेंद्र कोठारी, विलास किनेकर व सहकारी यांचे कडून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ब्लॅंकेट देण्यात आले.
तसेच मुर्तिजापुर येथिल देणगीदार मंडळी यांचेकडून दिड महिना अन्नदान करीता रोख स्वरुपात मदत मिळाली. दर्यापुर येथिल श्रीमंत पनपालीया शेठ व व्यापारी वर्ग यांचेकडून समाप्ती अन्नदान व वस्त्रदान सोहळ्याकरीता मोलाचे सहकार्य लाभले. तसेच अमरावती येथिल संत गाडगेबाबा सेवा समिती तर्फे दिपकबाबू कासट यांचे कडून उबदार ब्लॅंकेट, अंबिका क्लोथ स्टोर तर्फे खत्री शेठ यांचेकडून उबदार स्वेटर तसेच गोपाल किराणा तर्फे संदिप गुप्ता व अंबादास लटोबा कासार कंपनी यांचे कडून धान्य किराणाकरीता मदत, तसेच डेबु सावली वृध्दाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष शिंदे यांचेकडून रोखस्वरुपात मदत करण्यात आली. प्रामुख्याने भक्त निवासाकरीता उदार अंतकरणाने आमला येथिल शरद अजाबराव वानखडे यांचेकडून ८०० चौ.मी. जागा संस्थेला दान देण्यात आली. करीता संस्थेतर्फे बापुसाहेब देशमुख यांनी सर्व दानशुर मंडळी यांचे आभार मानले.
