WHO ची माहिती ; लसीमुळे कोरोना बरोबरच “ह्या”20 आजारांपासून मिळते संरक्षण

नवी दिल्ली वार्ता :- जगभरात करोनाने थैमान घातलं, लाखो लोकांचे जीव घेतले. अनेक ठिकाणी तर कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली. याशिवाय जगाचं आर्थिक चक्रही बिघडलं. मात्र, आता करोना लसीकरणाच्या मोहिमेमुळे हाच करोना आता नियंत्रणात येत आहे.करोना लस हेच करोनावरील परिणामकारक उत्तर आहे असं जाणकार सांगत आहेत. मात्र, तरीही अनेक ठिकाणी करोना लसीविषयी अनेक गैरसमज आणि अफवा असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) लसींबाबत जनजागृती करत आतापर्यंत लसीमुळे संरक्षण मिळालेल्या एकूण २१ आजारांची माहिती दिली आहे. तसेच सर्वांनी लसीकरण करावं असं आवाहन केलंय.

व्हॅक्सिन्स वर्क (Vaccines Work) या हॅशटॅगसह जागतिक आरोग्य संघटनेने लस घेतल्यामुळे संरक्षण होणाऱ्या २० पेक्षा अधिक आजारांची यादी जाहीर केलीय. तसेच सर्वांनी वेळेवर करोना लस घेण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचं आवाहन WHO ने केलंय.

करोना लसीमुळे कोणत्या २१ आजारांपासून संरक्षण होतं?

१. गर्भाशयाचा कर्करोग (Cervical cancer)
२. पटकी/कॉलरा (Cholera)
३. घटसर्प (Diphtheria)
४. इबोला (Ebola)
५. हेप बी (Hep B)
६. इन्फ्लुएंझा (Influenza)
७. जपानी एन्सेफलायटीस (Japanese encephalitis)
८. गोवर (Measles)
९. मेंदुज्वर (Meningitis)
१०. गालगुंड (Mumps)
१२. डांग्या खोकला (Pertussis)
१३. फुफ्फुसाचा दाह/न्यूमोनिया (Pneumonia)
१४. पोलिओ (Polio)
१५. रेबिज (Rabies)
१६ रोटा व्हायरस (Rotavirus)
१७. गोवर (Rubella)
१८. धनुर्वात (Tetanus)
१९. विषमज्वर (Typhoid)
२०. कांजण्या (Varicella)
२१. पीतज्वर (Yellow Fever)

मुलं करोना काळात देखील वाढत असतात. त्यामुळे या काळात त्यांची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढायला हवी. करोना लस सर्व वयोगटातील व्यक्तींना संरक्षण देते. मुलांना आरोग्यदायी आयुष्याच्या सुरुवातीसाठी लस देणे हा सर्वोत्तम पर्यायांपैकी एक पर्याय आहे. त्यामुळे लस घेण्यास उशीर करू नका, आजच आपली लस घ्या, असं आवाहन WHO ने आपल्या ट्वीटमध्ये केलंय.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!