पुणे वार्ता:-( प्रतिनिधी लहू लांडे)(३०) रक्तदान सर्व श्रेष्ठ दान , यंदा सालाबादप्रमाणे नवयुग मित्र मंडळ चाकण मंडळाच्या वतीने रक्तदान_शिबीर बरोबरच प्रॅश हॉस्पिटल तर्फे मोफत मधुमेह तपासणी करण्यात आली. तसेच मंडळ प्रत्येक वर्षी सामाजिक ,शैक्षणिक ,राजकीय ,कला ,क्रीडा ,क्षेत्रात सातत्याने काम करत असते तसेच मंडळ दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवत असते.
आज दिनांक रविवार दिनांक 30 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 ते 2 या येथे डॉ प्रशांत शेलार सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॅश डायबेटीस केअर व हाॅस्पिटल चाकण तर्फे मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले. खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील सुप्रसिध्द मधूमेह तज्ञ डॉ प्रशांत शेलार सर यांच्या मार्फत
ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग व आलेल्या सर्वांना मोफत आरोग्य तपासणी या आरोग्य शिबीर करण्यात आले आहे.तसेच तसेच नवयुग मित्र मंडळ चाकण यांच्यातर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले यात आज दिवसभरात चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले.
