प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम – निवासी प्रयाेजनासाठी आठ वर्षांपूर्वी अतिक्रमण केलेल्या नागरिकांना ते राहत असलेले घर नियमानुकूल करण्याची तयारी शासनाने दाखवली आहे. मंगरुळपीर शहरातील झाेपडपट्टीमधील सुमारे तिन हजारपेक्षाही अतिक्रमीत रहिवाशांना हक्काचा निवारा उपलब्ध करुन देण्यासाठी आता मंगरुळपीर येथील शिवसेनेचे विवेक नाकाडे आणी सचिन परळीकर पुढाकार घेणार असल्याने गरजुंना आता हक्काचे निवाले प्राप्त होण्यास मार्ग सुकर हाेणार आहे.
शासनाने २०२२पर्यंत सर्व बेघर कुटुंबांना घर देण्याची माेहिम सुरू केली आहे. प्रधानमंत्री आवास याेजनेतंर्गत शहरी भागात स्वत:च्या मालकीची जागा, वार्षिक उत्पन्न या निकषाच्या आधारे लाभार्थ्याची निवड केली जाते. परंतु, पात्र लाभार्थ्यांस स्वत:ची जागा नसणे किंवा महसूल अखत्यारित असलेल्या जमिनीवर अतिक्रमणधारकांचे प्रमाण भरपूर आहे.
अशा लाभार्थ्यास जर त्याला स्वत: घर बांधायचे झाल्यास अन्य पर्याय नसताे. त्यामुळे त्याला सरकारी जमिन उपलब्ध करून देण्याची तयारी शासनाने दाखवली आहे. तशा हालचालीही सुरू आहेत.माेठ्या झाेपडपट्ट्या या याेजनेतंर्गत पालिकेने यापुर्वीच सर्वेक्षण केले आहे. हक्काचे घर मिळावे म्हणून पालिकेकडे काही अर्ज यापुर्वीच प्राप्त झाले आहेत. यात शहरातील महसूलच्या जागेवर २०११ पुर्वीपासून असलेल्या बऱ्याच झाेपडपट्टीतील रहिवाशांचाही समावेश अाहे. या झाेपडपट्टीतील सर्वच रहिवाशांनी प्रधानमंत्री आवास याेजनेतून घरांसाठी निकष पूर्ण करून घरांचा लाभ मिळणार आहे.

जागा मालकीचा प्रश्न