महाळूंगे पोलीस | कंपनी मधील भंगार खरेदी करण्याचे बदल्यात व्यवसायिकाकडून खंडणी उकळणारे रॅकेटचा पर्दाफाश

दिनांक- २९/०१/२०२२ कंपनी मधील भंगार खरेदी करण्याचे बदल्यात व्यवसायिकाकडून खंडणी उकळणारे रॅकेटचा पर्दाफाश भंगार व्यवसायिकाचे तक्रारी वरुन महाळुंगे पोलीस चौकीमध्ये गुन्हा दाखल , मिळालेल्या माहितीनुसार

शाहूनगर, चिंचवड येथील एक भंगार व्यवसायिक हे चाकण एम.आय.डी.सी.मधील कंपन्यामधुन भंगार खरेदी करतात. ते पलॅश इलेक्ट्रोनिक्स कंपनी मधील गंगार खरेदी करीत असताना माहे नोव्हेंबर २०१८ मध्ये रेकॉर्डवरील हर्षल खराबी याने त्याचे साथीदारांचे मदतीने सदर व्यवसायिकाची भंगाराची गाडी अडवुन मगार खरेदी करावयार्थ नाही. जर भंगार खरेदी करावयाचे असेल तर दरमहिन्यास १५,०००/रु हप्ता चालु करावा लागेल व हप्ता दिला नाही तर जिवे मारण्याची धमकी दिल्याने व्यवसायिकाने हर्षल खराबी यास हप्ता देण्यास सुरुवात केली.

तसेच माहे एप्रिल / २०१९ मध्ये पुन्हा सदर व्यवसायिकाची भंगाराची गाडी अनिकेत खालकर व त्याचे साथीदारांनी अडवुन व्यवसायिकास एम. आय. डी. सी. मधील भंगार खरेदीचे काम पाहतो, व कंपन्यामधुन भंगार खरेदी करावयाचे असेल, तर १५,०००/रु हप्ता चालु कर, जर हपता दिला नाही, तर जिये ठार मारण्याची धमकी दिल्याने व्यवसायिकाने अनिकेत खालकर यारा हप्ता देण्यास सुरुवात केली.

माहे मार्च / २०१९ सदर मंगार व्यवसायिकाने बेलडन इंडीया कंपनी व रोजन बर्जर कंपनी मधील भंगार खरेदी करण्याचे टेंडर घेतल्यावर अनिकेत खालकर याने पुन्हा सदर भंगार व्यवसायिकास दोन्ही कंपन्यामधील भंगार खरेदी करावयाचे असेल, तर त्या भंगाराचे प्रत्येक किलो मागे १ रुपया अशी रक्कम हप्ता म्हणून मागितली

जर किलो मागे १ रुपया दिले नाही, तर व्यवसायिकास जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी दिल्याने व्यवसायिकाने किलो मागे १ रुपयाप्रमाणे अनिकेत खालकर यास हप्ता देण्यास सुरुवात केली.

हर्षल खराबी व अनिकेत खालकर यांना त्यांचे मागणी प्रमाणे हप्ता देत असुन सुध्दा त्या दोघांनी हप्ता रक्कम वाढवून मागणी केल्याने सदर भंगार व्यवसायिकाने आसाला कंटाळुन महाळुंगे पोलीस चौकीस हर्षल खराबी व अनिकेत खालकर यांचे विरोधात खंडणी मागितले बाबत तक्रार दिले वरुन चाकण पोलीस स्टेशन अंकित महाळुंगे पोलीस चौकी येथे गुन्हा रजि. नंबर १२२/२०२२. मा.द.वि. कलम ३८४ ३८५ ३८६, ३८२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेले आरोपींची नावे

हर्षल राजाराम खराबी, वय २६ वर्ष, रा-खराबवाडी, ता-खेड, जि-पुणे, (२) अनिकेत महादेव खालकर, राजवळे, ता-आंबेगाव, जि-पुणे

दि-१४/०८/२०२१ रोजी श्री. मचक इप्पर पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ १ पिंपरी चिंचवड यांनी हर्षल राजाराम खराबी यास ०२ वर्षासाठी पुणे शहर, पुणे ग्रामीण व पिंपरी चिंचवड शहर हद्दीतून तडीपार केले आहे. आरोपीचे शोधा करीता ०२ पथक रवाना करण्यात आले आहे.

मा. पोलीस आयुक्त श्री कृष्णप्रकाश यांनी कंपन्यामधुन भंगार खरेदी करणारे व्यवसायिकांना त्यांचेकडून खंडणी उकळणारे व्यक्तींचे विरोधात तक्रारी देण्याचे आवाहन केले असून गुन्हयाचा तपास मा. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश मा. अपर पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे, मा.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ मंचक इप्पर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) दशरथ वाघमोडे हे करीत आहेत.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!