महाळुंगे पोलीसांची कारवाई ;एमआयडीसी हद्दीमध्ये सराईत महिला आरोपी यांनी चोरलेल्या मुद्देमालासह भंगार व्यवसायिकास अटक

महाळूंगे वार्ता :- औद्योगिक वसाहतीमध्ये आस्थापनांना भयमुक्त वातावरणात कार्य करता यावे तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कंपनीमध्ये चोरीचे प्रमाण वाढल्याने मा. पोलीस आयुक्त सो, पिंपरी चिंचवड यांनी वारंवार गुन्हे घडणारे ठिकाणचे गुन्हे प्रवण क्षेत्र म्हणुन क्राईंग मॅपिंग करण्यात आले त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी तपास पथकाला वारंवार कंपनीमध्ये चोरी होणा-या ठिकाणाला ट्रॅप लावुन चोरी उघड आणणेबाबत आदेशित केले होते.

त्यानुसार स.पोनि गुळीग यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अंमलदारांनी वारंवार चोरी होणा-या ठिकाणांना भेटी देवुन कंपनीमध्ये चोरी गुन्हे घडले तारीख, वेळ, ठिकाण पडताळणी करण्यात आली व गुप्त बातमीदारा मार्फत माहिती काढण्यास सुरुवात केली.

त्यानुसार दिनांक-२०/०१/२०२२ रोजी सायंकाळी ०६.०० वा. दिनांक-२५/०१/२०२२ रोजी सकाळी ०८.०० वा. चे दरम्यान महिंद्रा अॅन्ड महिंद्रा लि कंपनी महाळुंगे चाकण ता.खेड जि. पुणे मधील एगई प्लॅन्ट मधील पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेले स्ट्रलिंग अॅन्ड विल्सन प्रा.लि. कंपनीचा असलेला GI THREADED ROD 12 MM चे ६३० मिटर असलेले एकूण ९ बंडल कोणीतरी अज्ञात चोरटयाने स्वतःचे फायदयाकरीता पत्र्याच्या शेडचा पत्रा कशानेतरी उचकटून शेड मध्ये प्रवेश करून अज्ञात इसम चोरटयाने चोरून नेल्याने फिर्यादी नामे अमितसिंग व्दारीकानाथ सिंग वय-३५ वर्ष व्यवसाय नोकरी रा. मोरेवस्ती, शांती सोसायटी, नगिना सोसायटी, साने चौकाचे जवळ, चिखली पुणे यांनी तक्रार दिल्याने चाकण पोलीस स्टेशन अंकीत महाळुंगे पोलीस चौकी भा.द.वि कलम ४५४४५७,३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल गुन्हयाचे तपासाच्या अनुषंगाने १) राजुबाई शहाजी अल्हाट, वय ३५ वर्षे, रा. आजाद चौक, निगडी सरकारी दवाखान्या समोर ओटा स्किमच्या मागे, भाजी मंडई, निगडी, पुणे २) जमुना (गौरी) नरेश वानखेड़े वय २८ वर्षे, रा. आझाद चौक, निगडी, सरकारी दवाखान्यासमोर, निगडी, पुणे ३) रेखा समाधान जाधव, वय ३८ वर्षे, रा. आझाद चौक, निगडी दवाखान्यासमोर, निगडी पुणे यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली.

त्यानुसार स.पो.नि गुळीग, पो.उपनि शिंदे, पो.हवा बोराटे, पो.ना. सांगळे, पो.शि लोखंडे, म.पो.शि घोलप असे मिळून नमुद तिनही महिला यांना शिताफीने ताब्यात घेवून महाळुंगे पोलीस चौकी येथे आणुन सखोल चौकशी केली असता त्यांनी महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीतील चोरलेला माल राहुल हनुमंता भिमाले, वय ४२ वर्षे धंदा भंगार खरेदी विक्री, रा. महाळुगे तळवडे रोड, कुरणवस्ती, इंडियन ऑइल पेट्रोल पंपाशेजारी, निघोजे, ता. खेड जि. पुणे यास विकल्याचे सांगितल्याने भंगार व्यवसायिका कडुन सदरथा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नमुद महिला आरोपी यांनी सॉप्टग्रीफ इंन्फ्रा प्रोडक्ट, एल. एल.पी वराळे फेज २. ता. खेड जि. पुणे असे असुन शॉप मधील चोरी केल्याचे सांगितले,

पोलीस ठाणे :-1) महाळुंगे पोलीस चौकी, कलम ४५७,३८० प्रमाने चोरीस गेलेला माल अॅल्युनियम इंगोट किंमत – ५,६९,४४६/ 2) महाळुंगे पोलीस चौकी भा.द.वि कलम प्रमाणे ४५४,४५७ ,३८०, ४११,३४ ,लोखंडी रॉड किंमत- ३३,४५३/

कंपनी मध्ये चोरी करणारे अटक केले महिला आरोपी

१) राजुबाई शहाजी अल्हाट, वय ३५ वर्षे, रा. आजाद चौक, निगडी सरकारी दवाखान्या समोर ओटा स्किमच्या मागे, माजी मंडई, निगडी, पुणे

२) जगुना (गौरी) नरेश वानखेडे, वय २८ वर्षे, रा. आझाद चौक, निगडी, सरकारी दवाखान्यासमोर, निगडी, पुणे

३) रेखा समाधान जाधव, वय ३८ वर्षे, रा. आझाद चौक, निगडी दवाखान्यासमोर, निगडी पुणे

सदर महिला आरोपीबाबत खात्री केली असता त्यापैकी राजुबाई शहाजी अल्हाट हिचेवर देहुरोड पोलीस स्टेशन गु.र.नं. ९६/२०११ भा.द.वि.क. ४६१,३८० अन्वये गुन्हा दाखल आहे.

कंपनीमधील चोरीचा माल विकत घेणारे भंगार व्यवसायिक अटक आरोपी राहुल हनुमंता भिमाले. वय ४२ वर्षे, धंदा भंगार खरेदी विक्री, रा. महाळुंगे तळवडे रोड, कुरणवस्ती, इंडियन ऑईल पेट्रोल पंपाशेजारी, निघोजे, ता. खेड जि. पुणे

कंपनीला अवाहन याद्वारे एमआयडीसी मधील कंपन्यांना अवाहान करण्यात येते की आपल्या कंपनीच्या आवारात सिक्युरिटी ठेवुन / सीसीटीव्ही लावण्यात याव्यात जेणेकरुन कंपनीमध्ये होणा-या चोरीस प्रतिबंध निर्माण होईल.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश मा अपर पोलीस आयुक्त श्री. संजय शिंदे, गा. पोलीस उप-आयुक्त श्री मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रेरणा कट्टे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक श्री अरविंद पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री दशरथ वाघमोडे, सहा पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पो.उपनि किरण शिंदे, पो.हवा राजू कोणकेरी, अमोल बोराटे, पो.ना विठ्ठल वडेकर, संतोष काळे, युवराज बिराजदार किशोर सांगळे पो.कॉ/ शिवाजी लोखंडे, संतोष वायकर, बाळकृष्ण पाटोळे, म.पो.शि घोलप यांनी केली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!