कंपनी मधील महिला कामगारास लैंगिक शेरेबाजी , कंपनी मॅनेजर विरोधात महाळुंगे पोलीस चौकीमध्ये गुन्हा दाखल

दिनांक-२९/०१/२०२२

चाकण एम. आय. डी. सी. मधील व्हेरॉक इंजिनिअरिंग मध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करणारे जॅक्सन अरुण आल्हाट यांनी पदाचा दुरुपयोग करून कंपनीमध्ये हाताखाली काम करणाऱ्या महिलास तिचे पाठीवर व पोटावर वाईट हेतुने व भावनेने हात फिरविला. त्याच बरोबर मोबाईल फोनवरून व्हॉट्स अॅपचे आधारे अश्लिल शेरेबाजीवे एस. एम. एस. पाठवुन डोळा मारून तोंडाने चुंबन घेतल्याचे हावभाव करून मनारा लज्जा उत्पन होईल असे कृत्य केले.

सदर बाबत पिडीत महिलेने कंपनी व्यवस्थापनाकडे लेखी तक्रार करून सुध्दा असिस्टंट मॅनेजर विरोधात शीघ्र कारवाई न झाल्याने व्यथित झालेल्या पिडीत महिलीने महाळुंगे पोलीस चौकीस लेखी तकारी अर्ज दिल्याने बौकशीवरुन वाकण पोलीस स्टेशन अंकित महाळुंगे मोलीस चौकी येथे गुन्हा रजि. नंबर १२१/२०२२ मा.द.वि. कलम ३५४ ३५४(अ). (ड). ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक आरोपी :

जैक्सन अरुण आल्हाट, वय ३४ वर्ष रा-सव्हें नंबर ६७ रोडनंबर १४ भैरवनगर, धानोरे रोड, पुणे. आरोपीरादि-२८/०१/२०२२ रोजी ०१.०४ वा अटक केली असून १४ दिवसांची मंजिस्ट्रेट कस्टडी घेण्यात आली आहे.

महाळुंगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी एम. आय. डी. सी. मधील कंपन्यामध्ये काम करणार महिला भगिनींना कामाचे ठिकाणी त्यांचेवर लैंगिक शेरेबाजी अगर त्रास होत असल्यास त्याबाबत तक्रार देण्याचे आवाहन केले आहे. तसेच कंपनीमध्ये विशाखा समिती स्थापन करून महिला कामगार भगिनीचे तक्रारी शीघ्रगतीने चौकशी करून उचित कारवाई करावी असे कंपनी व्यवस्थापनसाठी सुचना दिल्या आहेत.

सदर गुन्हयाचा तपास मा.पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश, मा. अपर पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे, मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ मंचक इप्पर मा.सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार याचे सुचना व मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक सारंग चव्हाण हे करीत आहेत.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!