Post Views: 672
ओळखीचे इसमाने मैत्री करून केली शरीर सुखाची मागणी ; पिडीत महिलेच्या तक्रारी वरुन महाळुंगे पोलीस चौकीमध्ये गुन्हा दाखल एकास अटक
मौजे-महाळुंगे, ता-खेड, जि-पुणे येथील पिडीत महिलेच्या घरा शेजारी राहणारा इसम नाम र पिर मोहम्मद, वय २३ वर्ष रा-वराळे रोड, महाळुंगे, ता-खेड, जि-पुणे याने शेजारी राहणारे पिडीत महिले सोबत ओळख निर्माण करून तिचे सोबत प्रेमाने बोलून तिचेकडून अर्धनग्न फोटो प्राप्त करून घेतले. त्यानंतर तिला सोबत शरीर संबंध ठेवण्याची जबरदस्ती करून शरीरसंबंध ठेवले नाही तर, तीचे फोटो फेसबुक सोशल मिडीयावर प्रसारीत करण्याची धमकी दिली. तसेच सदरचे फोटो फेसबुक सोशल मिडीयावर प्रसारीत करून पिडीत महिलेचा विनयभंग केल्याचे तक्रारी दरुन चाकण पोलीस स्टेशन अंकित महाळुंगे पोलीस चौकी येथे गुन्हा रजि नंबर ११४/२०२२ मा.द.वि.कलम ३५४(अ) (छ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक आरोपी : नुर पिर मोहम्मद, वय २३ वर्ष रा-वराळे रोड, महाळुंगे, ता-खेड, जि-पुणे आरोपीस दि- २६/०१/२०२२ रोजी अटक केली असून १४ दिवसाची मॅजिस्ट्रेट कस्टडी घेण्यात आली आहे.
महाळुंगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी महिला-भगिनींनी व्हॉट्स अॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, शेअरघाट रनॅपबाट अरो सोशल मिडीयाचा वापर करताना अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेसट स्विकारु नये, सोशल मिडीयाद्वारे स्वतःचे खाजगी फोटो शेअर करु नये, सोशल मिडीयाचा वापर करताना त्याचे सुरक्षा सेटींगची माहिती घेवुन सोशल मिडीया हाताळाचे, असे आवाहन केले आहे.
सदर गुन्हयाचा तपास ना. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश मा अपर पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे मा पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ मंचक इप्पर मा. सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक सारंग चव्हाण हे करीत आहेत.